सेवानिवृत्त कर्मचाºयांचा लक्ष्मीपूजनाला आत्मक्लेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:35 PM2017-10-18T23:35:51+5:302017-10-18T23:36:04+5:30
जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. आठव्या दिवशी बैठा सत्याग्रह सेवाग्राम आश्रम परिसरात सुरू आहे. अद्याप आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून लक्षीपूजनाच्या दिवशी आत्मक्लेष आंदोलन करणार येणार आहे.
सेवाग्राम आश्रमासमोर असंघटीत सर्व जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे. २००७-०८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅज्युटी अधिक रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त भत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित अदा करावा, २०१० पासून स्वेच्छा निवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, राज्य शासनाच्या ३ आॅगस्टच्या निर्णयानुसार कार्यमुक्त केलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅज्युटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता, प्रलंबित नियमित वेतन, स्वेच्छा निवृत्तीची नुकसान भरपाई तसेच २००१ ते २००९ या कालावधीतील महागाई भत्ता त्वरित द्यावा आदी मागण्यांसाठी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात सदर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सतीश काळे, अशोक मगर, सागर कुत्तरमारे, मधुकर प्रांजळे, सुरेश रहाटे, वानखेडे, चित्रकला रहाटे आदी सहभागी झाले आहेत. तसेच तोडगा निघाला नसल्याने गुरूवारी आत्मक्लेष करणार आहे.
लक्ष्मीपूजनाला विदर्भातील अनेक सहकारी सहभागी होणार
१९ आॅक्टोबरला सकाळी १० वाजतापासून प्रारंभ होणाºया आत्मक्लेष आंदोलनात विदर्भातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहचारिणी व कुटुंबासह सहभागी होतील. राज्यकर्त्यांनी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर आर्थिक देण्याबाबत निर्णायक पाऊल उचलून सकारात्मक कार्यवाही न केल्यास, शासनाची ही कृती बेजवाबदार ठरेल असा खेद व्यक्त केला.
जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर असताना पारदर्शक शासन मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा खेद आंदोलनकर्त्यांना व्यक्त केला. दिवाळी सणाच्या दिवशी १९ आॅक्टोबरला रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय होईपर्यंत सत्याग्रह अखंड चालूच राहणार असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.