पालिकेकडून भाजीविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:19 PM2018-01-25T22:19:36+5:302018-01-25T22:19:48+5:30

पालिकेच्यावतीने बाजाराचा विकास साधण्यात येत असून यात भाजीविक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा आरोप करीत भाजीविक्रेत्यांनी बंद पुकारला. याचा नागरिकांना त्रास होत आहे. तो टाळण्याकरिता गुरुवारपासून पालिकेच्यावतीने जुन्या बसस्थानक परिसरात भाजीची दुकाने लावण्यात आलीत.

Selling of vegetables from the city | पालिकेकडून भाजीविक्री

पालिकेकडून भाजीविक्री

Next
ठळक मुद्देभाजीबाजार बंद असल्याने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पालिकेच्यावतीने बाजाराचा विकास साधण्यात येत असून यात भाजीविक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा आरोप करीत भाजीविक्रेत्यांनी बंद पुकारला. याचा नागरिकांना त्रास होत आहे. तो टाळण्याकरिता गुरुवारपासून पालिकेच्यावतीने जुन्या बसस्थानक परिसरात भाजीची दुकाने लावण्यात आलीत.
भाजी विक्रेत्यांचा बंद कायम आहे. आज येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजार व बांधकामाच्या मुद्यावर पालिका प्रशासन व भाजीविक्रेते आपापल्या प्रश्नावर ठाम राहिले. मागील चार दिवसांपासून सुरू असलेला भाजीपाला व्यावसायिकांचा संप आर्वीत सध्या चिघळला आहे. यात शहरातील नागरिकांना मात्र आर्वीत चढ्या भावाने व बाहेर गावाहून भाजीपाला आणावा लागत असल्याचे चित्र आहे.
आर्वीतील आठवडी बाजारात ३३० भाजीविक्रेते व्यावसायिक आहेत. यात आर्वी पालिकेने आठवडी बाजारातील अर्ध्या जागेवर वाहनतळ व उर्वरित जागेवर ओटे तयार करण्याचे सुरू केले होते. त्यामुळे या जागेवर भाजीविक्री करणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांनी पालिकेच्या या कामाला विरोध करून बेमुदत संपाची हाक दिली. पाालिकेच्यावतीने करण्यात येणाºया बाजार ओटे बांधकामाला विरोध केला. यासंदर्भात भाजी विक्रेत्यांनी आ. अमर काळे व माजी आमदार दादाराव केचे यांच्या चर्चा करून यावर तोडगा काढण्याची मागणी आहे.
आज चौथ्या दिवशीही भाजीविके्रते व पालिका प्रशासन यांच्यात कुठलाही तोडगा न निघाल्याने भाजी विके्रत्यांचा बंद सुरुच राहणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आर्वी पालिकेने पुढाकार घेत सर्व न.प. सदस्यांच्या उपस्थितीत सामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी आर्वीतील जुन्या बसस्थानकासमोर भाजीविक्रीची दुकाने लावली. येथून ग्र्राहकांनी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी केली. मात्र दुपारनंतर तालुक्यातून आर्वी शहरात येणाºया गावकºयांना भाजी मिळाली नाही. या बंदवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अमरावती येथून मागविला भाजीपाला
आर्वीत गत चार दिवसांपासून भाजी विक्रेत्यांचा बंद सुरू आहे. यात नागरिकांची धावपळ होत असल्याने माजी आमदार दादाराव केचे यांनी थेट अमरावती येथून भाजीपाला मागवून योग्य दराने उपलब्ध करून दिला. आर्वी नगर पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, भाजपचे सर्व पधादिकारी यांनी एकत्रित येऊन गुरुवारी भाजी विक्री केली. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. गुरुवार आठवडी बाजार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे म्हणाले, सौंदर्यीकरनाच्या शासकीय बांधकामात अडथळा आणून हे काही व्यावसायिक राजकारण करीत आहेत. दोन दिवसांत सावतामाळी बाजार आम्ही नागरिकांसाठी सुरू करीत आहोत. भाजी व्यावसायिक, दलाल यांची मध्यस्थी बंद होईल आणि शेतकºयांचा भाजीपाला सरळ नागरिकांना योग्य भावात मिळेल.

आर्वी पालिकेने आठवडी बाजाराचे बांधकाम करण्यापूर्वी भाजीविक्रेता व इतरांना विश्वासात घेणे गरजेचे होते. यामुळे बाजार बंद ठेवण्याची वेळ आली नसती व नागरिकांची गैरसोय टाळता आली असती. पालिकेने यावर तातडीने तोडगा काढावा.
- अमर काळे, आमदार, आर्वी.

शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे आर्वी शहराचा विकास होत आहे. आठवडी बाजाराचे बांधकाम होईल. यात भाजीविक्रेते व इतर कोणत्याही व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.

Web Title: Selling of vegetables from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.