‘सम्राट अशोक चक्रवर्ती राजा’वर परिसंवाद
By Admin | Published: March 30, 2015 01:51 AM2015-03-30T01:51:02+5:302015-03-30T01:51:02+5:30
येथील बी.आर.सी. युनिट द्वारा बोधिसत्व सम्राट अशोक मौर्य यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
वर्धा : येथील बी.आर.सी. युनिट द्वारा बोधिसत्व सम्राट अशोक मौर्य यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. शुक्रवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात परिसंवाद घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. सुरजित सिंह उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी साहित्यिक डॉ. सुनीलकुमार सुमन, रवींद्र जिन्दे, बामसेफ जिल्हा संयोजक अरविंद खैरकार, प्रा. वानखेडे, अॅड. अविनाश भगत, सुरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर मेजर ढोबळे मेजर यांच्या मार्गदर्शनात सम्राट अशोक मौर्य यांना ‘गॉड आॅफ आॅनर’ मानवंदना देण्यात आली. मानवंदनाचे संचालन प्रशिल पानबुडे यांनी केले. यावेळी बोलताना जिन्दे म्हणाले, भारतीय संविधानाचा सम्राट अशोक मौर्य यांच्या कार्यकाळासोबत संबंध आहे, असे सांगितले. तरा डॉ. सुमन यांनी ‘आजचा काळ आणि सम्राट अशोकाचा वारसा’ यावर मार्गदर्शन केले.
डॉ. सुरजित सिंह यांनी सम्राट अशोक आणि त्यांच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देताना प्रशासन व्यवस्था, शत्रु सैनिकांचे मृतदेह बघुन दु:खी होणारा राजा, दु:ख शिलालेखाद्वारे व्यक्त करणारा एकमेव सम्राट अशोक आहे. अशोक मौर्य यांचे चक्र राष्ट्रध्वजावर विराजमान असुन चार सिंहमुखी अशोकस्तंभ भारतीय राजमुद्रेचे प्रतिक आहे. यानंतर परिसंवाद घेण्यात आला.
प्रास्ताविक आशिष बैले यांनी केले. संचालन पंकज सातपुडके यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी कुंभारे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रशेखर मडावी, आशिष सोनटक्के, नितीन निमरद, अमोल ओंकार, शरद भवन, राम येघरे, अनिल उईके, नयन झामरे, अजय कांबळे, अजीत करवाडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)