सेलू बाजार समितीत व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:33 PM2018-08-27T22:33:53+5:302018-08-27T22:34:07+5:30

शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

Semiotic property of merchants in the Seloo Market Committee | सेलू बाजार समितीत व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप

सेलू बाजार समितीत व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप

Next
ठळक मुद्देहमी भावासाठी व्यापाऱ्यांवर कारवाईच्या निर्णयाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
शेतकºयांनी उत्पादित केलेला धान्य माल खरेदी करण्याची व ती साठवून ठेवण्याची कोणतीही पुरेशी व्यवस्था नाही. शासनाने खरेदी केलेल्या मालाचे अद्यापही चुकारे मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर व्यापारीच शेतमाल खरेदी करण्यासाठी आशेचा किरण असतो. व्यापारी शेतमालची खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे ग्रेडिंग न करता सरसकट माल खरेदी करीत असतो. परंतु शासनाने नुकताच व्यापाºयांविरोधात जाचक निर्णय घेवून मुस्कटदाबी करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा बाजार समितीतील धान्य खरेदी व्यवहार बेमुदत बंद करु असा इशारा व्यापाºयांनी दिला.
यावेळी व्यापारी सतीश धोपटे, विक्रम जयस्वाल, संजय तडस, नरेंद्र अग्रवाल, रामनारायण पाठक, वरुण दफ्तरी आदींनी पत्रकार परिषदेत शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.त्यानंतर सभापती विद्याधर वानखेडे यांनी शासनाचा हा निर्णय व्यापाºयांना जेवढा घातक आहे, तेवढाच शेतकºयांनाही मारक आहे. असे सांगून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला.
यावेळी व्यापारी संजय तडस, विक्रम जयस्वाल, नरेंद्र अग्रवाल, सतीश धोपटे, वरुण दफ्तरी, रामनारायण पाठक, अशोक दंडारे, संदीप सांगोळकर, अशोक नाखले, संजय सोनटक्के, अनिकेत उराडे, दिपक रघाटाटे, पल्केश सावरकर, प्रवीण राऊत, राजू तडस, पवन सिंघानिया, घनश्याम ठाकरे, मारोतराव कुकडे, रविंद्र वैरागडे, नामदेव ठोंबरे, अनिल चांभारे, निलेश हाते, प्रमोद पराते, रमेश कळसाईत, अजय सोमनाथे, नामदेव बजाईत, विष्णू चांभारे आदी उपस्थित होते.

Web Title: Semiotic property of merchants in the Seloo Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.