धक्कादायक! खासदाराच्या मुलाकडून शारीरिक शोषण; वर्ध्यातील युवतीचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 06:55 PM2021-09-04T18:55:39+5:302021-09-04T22:19:59+5:30

Wardha News भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.

Sensational; Physical abuse of a young woman by the son of an MP from Wardha | धक्कादायक! खासदाराच्या मुलाकडून शारीरिक शोषण; वर्ध्यातील युवतीचा गंभीर आरोप

धक्कादायक! खासदाराच्या मुलाकडून शारीरिक शोषण; वर्ध्यातील युवतीचा गंभीर आरोप

Next
ठळक मुद्देपीडितेची नागपूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. यापूर्वी वर्धा येथील पोलीस अधीक्षकांकडेही याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हे प्रकरण आता कौटुंबिक न्यायालयात दाखल असल्याचे खा. रामदास तडस यांनी सांगितले आहे.  तर खासदार पूत्र पंकजने कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन बनावट विवाहाचे चित्र उभे करीत आपली फसवणूक केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

(Sensational; Physical abuse of a young woman by the son of an MP from Wardha) (Ramdas Tadas)

 

खा. तडस यांचे पुत्र पंकज तडस याने वर्धा शहरातील एका मुलीसोबत सूत जुळविले होते. त्यानंतर दोघांनीही ६ ऑक्टाेबर २०२० राेजी विवाह केला. काही काळ ते वर्धा शहरात वास्तव्याला होते. त्यानंतर सदर पीडित मुलगी देवळी येथे तडस यांच्या घरीही राहण्यास गेली होती. मात्र, कालांतराने दोघांत वितुष्ट आल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी वर्धा पोलिसांनी चौकशी अहवालही तयार केला आहे. आता या प्रकरणात मुलीने पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली असून, या तक्रारीत गैरअर्जदार म्हणून पंकज तडस, खा. रामदास तडस व यांच्या पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

पीडितेला त्रास दिलेला नाही

- तक्रारकर्त्या मुलीचे व पंकज यांचे लग्न झाले आहे. सदर मुलगी व पंकज काही काळ वर्धा येथे एकत्र राहत होते. त्यानंतर मुलगी देवळी येथे एकटी राहण्यासाठी आली. मुलगा पंकज हा वर्धेला राहत होता. दोघांत वितुष्ट आले. त्यामुळे याप्रकरणी मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांसमक्ष या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली आहे, तर आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात दाखल आहे. आपल्या परिवाराने कुठलाही त्रास पीडितेला दिलेला नाही.

- रामदास तडस, खासदार, वर्धा

 ती म्हणते, पंकजने बनावट विवाहाचे चित्र उभे केले

तक्रारकर्त्या मुलीशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता तिने आपली बाजू मांडली. ती म्हणाली, पंकजने बनावट विवाहाचे चित्र उभे केले. रोशन ठाकूर या मुलाच्या माध्यमातून शिव वैदिक विवाह संस्थेचे कोरे प्रमाणपत्र आणले. त्यावर माझ्या सह्या घेतल्या. याशिवाय काही कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या. नंतर त्या आधारावर नोटरी करून घेतली. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ही प्रोसीजर करीत असल्याचे सांगून एक महिन्यांनी रीतसर कोर्टातून लग्न करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आपण त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. यानंतर पंकज मला मोबाइलवर फोन करायचा. आपल्या फ्लॅटवर फ्रीज घेतला, टीव्ही घेतला, पडदे लावू अशी कारणे सांगून फ्लॅटवर येण्यास सांगायचा. मी नकार द्यायचे. आधी आपण सार्वजनिकरीत्या लग्न करू, समाजमान्यता मिळवू, असे मी त्याला सांगत होते. मात्र, शेवटी त्याच्या त्राग्याला कंटाळून मी दोन महिन्यांनी फ्लॅटवर गेले. काही दिवसांनी पंकज मला मारझोड करू लागला. शिव्या देऊ लागला. तू ठेवलेली बाई आहेस. मी म्हणेल तसे वागायचे असे सांगून धमकावू लागला. हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्यामुळे आपण तक्रार दाखल करण्याचे पाऊल उचलले, असेही तक्रारकर्त्या मुलीने सांगितले.

Web Title: Sensational; Physical abuse of a young woman by the son of an MP from Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.