वंचितांच्या दिवाळीसाठी ‘सेवा’भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:43 PM2018-11-06T23:43:42+5:302018-11-06T23:44:30+5:30
दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते. अशांच्याही घरात दिवाळी साजरी व्हावी यासाठी सेवा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून त्यांना सावंगीचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव यांच्या परिवाराने साथ दिली आहे.
सावंगाचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव यांनी खाकीवर्दीतील आपल्या कार्यासोबतच सामाजिक दायित्वही जोपासले आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी सहपरिवार सेवा फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभाग घेतला. सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी पुनर्वसन तसेच सालोड या गावातील गरीब, असहाय, विधवा, अनाथ, वृध्द तसेच शेतमजूर यांच्या घरी भेट देऊन किराणा साहित्य, मिठाई व फराळावे साहित्य दिले. तसेच आता थंडीचे दिवस असल्याने आरोग्याची काळजी म्हणून त्यांना उष्ण कपडल्याचेही वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे परिस्थितीशी दोन हात करुन जीवन जगणाऱ्यांसाठी दिवाळी, दसरा हे सारेच सण सारखेच असतात. म्हणून त्यांच्या चेहºयावर आनंद फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न सेवा फाऊंडेशन व पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव यांच्या परिवाराकडून दरवर्षी केल्या जातो. यावेळी दत्तात्रय गुरव यांच्या परिवारासह सेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद आगळेकर, डॉ. बाभुळकर, सुधीर वैतागे, प्रवीण भगत, सावरकर, रहागटे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाल्याने कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. यात सेवा फाऊंडेशनची साथ मिळाल्याने हे कार्य सुकर झाले आहे. आज परिवारासह वंचितांच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले.
-दत्तात्रय गुरव, पोलीस निरिक्षक, सावंगी (मेघे)