लेखी आश्वासनानंतर अपंगांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:06 PM2017-09-28T22:06:58+5:302017-09-28T22:08:30+5:30

अपंगांना व्यवसायासाठी भूखंड देण्याच्या नगर परिषदेच्या ठरावाला तीन वर्षे लोटली; पण अद्याप पाच अपंगांना भूखंड देण्यात आले नव्हते. शिवाय अपंगांचा ३ टक्के निधीचा २०११ पासूनचा अनुशेष कायम होता.

Settlement of disabled fast after written assurances | लेखी आश्वासनानंतर अपंगांच्या उपोषणाची सांगता

लेखी आश्वासनानंतर अपंगांच्या उपोषणाची सांगता

Next
ठळक मुद्दे ३ टक्के निधी प्रलंबित : ठरावानंतरही भूखंड वाटपास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : अपंगांना व्यवसायासाठी भूखंड देण्याच्या नगर परिषदेच्या ठरावाला तीन वर्षे लोटली; पण अद्याप पाच अपंगांना भूखंड देण्यात आले नव्हते. शिवाय अपंगांचा ३ टक्के निधीचा २०११ पासूनचा अनुशेष कायम होता. यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेने डॉ. आंबेडकर चौकात तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. गुरूवारी मुख्याधिकारी जगताप यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली.
शहरातील ६०७ अपंगांपैकी पाच अपंगांनी मागणी केल्याप्रमाणे न.प. प्रशासनाने २०१४ मध्ये अपंगांसाठी भूखंड वाटपाचा ठराव आमसभेत घेण्यात आला. या ठरावानुसार गोल बाजार परिसरात १० बाय १० चे गाळे पाच अपंगांना देण्यास न.प. सभागृहाने मान्यता दिली. ठराव होऊन तीन वर्षे लोटली; पण कार्यवाही झाली नाही. शासनाच्या नियमानुसार अपंगांना न.प. टॅक्स वसुलीच्या ३ टक्के रक्कम सहायता म्हणून दिली जाते. शहरातील एकूण ६०७ अपंगांची यादी पालिकेने तयार केली आहे. त्यानुसार या वार्षिक कर वसुली प्रमाणे १६४७ रुपये प्रती अपंग देय निघाले. २२८ अपंगांना हा १६४७ रुपयांचा निधी वळता करण्यात आला; पण उर्वरित अपंगांना न.प. प्रशासन देयक देण्यास टाळाटाळ करीत होते. संघटनेने अनेकदा निवेदन देत आंदोलने केली; पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या नेतृवात राजेश पंपनवार, प्रदीप कांबळे, दिवाकर ऊगे या तीन अपंगांनी आमरण उपोषण सुरू केले.
दरम्यान, पालिकेने २८८ अपंगांना निधी दिला. आता १६७ अपंगांना निधी देय आहे. गुरूवारी मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी उपोषणस्थळाला भेट देत चर्चा केली. यावेळी कुबडेसह प्रमोद कुराडकर, झोंटीग, राजेश बोभाटे, जगदीश तेलहांडे, अजय लढी, प्रदीप शेंडे, संजय बोरकर, रंजना मडावी, गंगा बावणे, आकाश बोकरे, हरिष भजभूजे व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर जागा निवासी वापराची आहे. व्यावसायिक वापर परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे ३ आॅक्टोबरला पत्र प्राप्त होताच एक महिन्यांत भूखंडाचे वाटप करून दोन महिन्यांत अपंग निधीची थकबाकी देण्याचे लेखी आस्वासन मुख्याधिकारी जगताप यांनी दिले. यावरून लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
१६७ अपंगांचा निधी शिल्लकच
नगर पालिका प्रशासनाने अपंगांना भूखंड वाटप करणे तथा ३ टक्के निधी वाटपास तीन वर्षांपूर्वी आमसभेत ठराव घेऊन मंजुरी प्रदान करण्यात आली होती; पण अद्याप यावर कार्यवाही करण्यात आली नव्हती. परिणामी, अपंगांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. तीन दिवसांच्या उपोषणामुळे कार्यवाही झाली.

Web Title: Settlement of disabled fast after written assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.