लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:20 PM2018-01-31T23:20:35+5:302018-01-31T23:20:46+5:30

आठवडी बाजारातील मटन मार्केट हटवावे तथा अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचने २७ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी या आंदोलनाला यश आले. मंचच्या सर्व मागण्या मान्य करीत दोन महिन्यांत दुकाने हटविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.

Settling for fasting on the fourth day after written assurance | लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता

लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता

Next
ठळक मुद्देमागण्या मान्य : दोन महिन्यांत हटविणार दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : आठवडी बाजारातील मटन मार्केट हटवावे तथा अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचने २७ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी या आंदोलनाला यश आले. मंचच्या सर्व मागण्या मान्य करीत दोन महिन्यांत दुकाने हटविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली.
बाजार परिसरात मंदिर, व्यायाम शाळा, ग्रा.पं. कार्यालय आहे. शिवाय मटन मार्केटमुळे भाजी बाजाराला जागा अपुरी पडत होती. तेथील गाळे निकामी पडून होते. या विरूद्ध जन युवा मंचने ग्रा.पं. कार्यालयाच्या मार्गावर २६ जानेवारी रोजी जाहीर सभा घेत मिरवणूक काढली व २७ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले. शिवसेनेच्या पाठींब्याने जन युवा मंचचे अध्यक्ष योगेश वरभे व ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे हे उपोषणास बसले होते. पहिल्या दिवशी कुठलीही तडजोड झाली नाही तर दुसºया दिवशी सुटी आल्याने चर्चा टळली. तिसºया दिवशी प्रदीप नागपुरे व पं.स. सदस्य अमोल गायकवाड यांनी मध्यस्थी केली; पण ग्रा.पं. ने पाच महिन्यांची वेळ मागितली. जन युवा मंचने ती अमान्य केल्याने चौथ्या दिवशी दामुजी घुसे, अमोल गायकवाड, गोपाल गिरडे यांनी पुन्हा मध्यस्थी करीत तडजोड केली.
ग्रा.पं. प्रशासनाने चौथ्या दिवशी सर्व मागण्या मान्य करीत गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तहसीलदार सचिन यादव यांच्याशी चर्चा केली. शिवाय दोन महिन्यांत मटन मार्केटची जागा मोकळी करून अन्य समस्या मार्गी लावण्याची लेखी ग्वाही देण्यात आली. यावरून सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी अशोक गव्हाळे, ठाणेदार विजय नाईक, तलाठी धोंगडी यांनी उपोषणकर्ते वरभे, मेघरे यांना लिंबुपाणी देऊन उपोषण सोडविले.
यावेळी सतीश व नितीन चंदनखेडे, गोपाल गिरडे, माधव ढगे, कैलास हुलके, अरविंद साखरकर, दशरथ पेटकर, प्रितम वरघणे, नितीन सेलकर, राजू रेंढे, रामू बाळबुधे, कैलास पिंपळापुरे, युसूफ कुरेशी यासह मंच व सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Settling for fasting on the fourth day after written assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.