सेवाग्रामचे डॉक्टर्स केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:35 PM2018-08-27T22:35:33+5:302018-08-27T22:35:49+5:30
केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रियदर्शन तुर्य, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर यांच्यासह तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर, १ परिचारिका आणि १६ पदवीपूर्व विद्यार्थी, ७ केरळ येथील विद्यार्थी, ३ स्वंयसेवक २३ आॅगस्ट रोजी रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रियदर्शन तुर्य, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर यांच्यासह तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर, १ परिचारिका आणि १६ पदवीपूर्व विद्यार्थी, ७ केरळ येथील विद्यार्थी, ३ स्वंयसेवक २३ आॅगस्ट रोजी रवाना झाले. त्यांनी एनाकुर्लम् गाठून कार्य सुरू केले आहे. या डॉक्टरांनी पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी तेथे चार चमू तयार केल्या आहेत.
डॉ. बोरकर आणि डॉ. उक्के यांना जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी कोट्टायमला पाठविण्यात आले आहे. डॉ. अमित सिंग आणि डॉ. देदेव अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यासोबत आघाडीत काम करण्यासाठी कोथमंगलम् येथे कार्यरत आहे. डॉ. टीअर, डॉ. गणेश हे दोघे एनाकुर्लम् जवळील परिसरात डॉक्टर्स फॉर यू (डीएफवाय) नावाच्या गैर सरकारी संस्थेसोबत काम करीत आहेत. आपत्तीनंतर अत्यंत महत्त्वाचे असलेले स्वच्छ पाणी, घर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, अन्न स्वच्छता आदी विषयांवर आरोग्य विषयक शिक्षण देण्यावरही लक्ष केंद्रीत करून आहे. कोठमांगलम् येथील पथकाने एनएसएसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले आहे. शिवाय पूरग्रस्त क्षेत्रामध्ये जात असताना त्यांना स्वच्छता व स्वच्छतेविषयक कामांचे मुलभूत धडे देण्यात येत आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक, पंचायत उपाध्यक्ष, आशा कामगार आणि स्थानिकांना आरोग्य समस्याबद्दल चर्चा करून दुर्गम आदिवासी बहुल भागात ५० पेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पुरग्रस्त भागात भिंत, फरशी, घर परिसराची स्वच्छता व निजंर्तूकिकरण आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांना प्रात्याक्षिकाद्वारे माहिती दिली जात आहे. स्थानिक एम. ए महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. सर्व संघांना विहिरी, पाण्याची टाकी, शाळा, रुग्णालये स्वच्छ करण्यामध्ये आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगण्यात आले आहे. सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाची चमु घरे, रुग्णालये, कृषी जमिनी, पिके, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांच्या नियमित भेटी आदीवर लक्ष केंद्रीत करून आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे यांचे यात सहकार्य लाभत आहे. शिवाय फार्मासिस्ट असोसिएशन आॅफ वर्धा यांनीही या चमूला सहकार्य केले आहे. वर्धा शहरातील लोकांकडून पुरेशी रक्कम गोळा करून येथे मदत कार्य राबविण्यात येत आहे. केरळला गेलेल्या चमूत डॉ. प्रियदर्शन, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर, डॉ. गणेश भंडारे, डॉ. विद्या पांचाल, डॉ. पंकज उके, डॉ. महादेव घोरपडे, सारिका गायकवाड, सावित्रीदेवी चित्रलक्ष्मी, अंजली मोहन, मधुर श्रॉफ, सुधीर वर्मा, शिजू शिवरामण, अब्दुल वहाब, अशिक्क, सौरभ शर्मा, राजेंद्र यादव, जावेद झुएर अली आबिद आदी आहेत.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची मदत चमू केरळमध्ये अतिशय चांगल व जबाबदारीने काम करीत आहे. चार गटात त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवा पुरविण्यासोबतच पुरानंतर उद्भवणाºया परिस्थितीबाबतही प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या चमूसोबत केरळ राज्यातील आपल्या येथे शिकणारे विद्यार्थी सोबत असल्याने अतिशय चांगल काम करण्यात येत आहे. एक लाख रूपयाचा आर्थिक मदतही तत्काळ देण्यात आली. शिवाय एक दिवसाचा पगार आयुर्विज्ञान संस्थेमार्फत केरळच्या पीडितांना लवकरच पाठविला जाणार आहे.
- डॉ. नितीन गंगणे, अधिष्ठाता महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.