सात जुगाऱ्यांना अटक साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: March 29, 2015 02:04 AM2015-03-29T02:04:25+5:302015-03-29T02:04:25+5:30
बावण ताशपत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या सात जुगाऱ्यांना शहर पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले़ ...
वर्धा : बावण ताशपत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या सात जुगाऱ्यांना शहर पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले़ यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डेहनकर ले-आऊट मीरानगर येथे करण्यात आली़
पोलीस सूत्रांनुसार, सदर परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली़ त्यांनी तपासाची सूत्रे फिरवीत पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे यांना माहिती दिली़ त्यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाड टाकली असता त्यांना सात जण ताशपत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले़
यात शरद विजयकुमार गुप्ता (३६) रा़ आर्वीनाका, शेख इरफान शेख रफिक (३२) रा़ महादेवपुरा, मोहित इंद्रशेष टिबडीवाल (३०) रा़ सराफा लाईन, आशिष माणिकराव निखाल रा़ सानेगुरूजीनगर, अभिलाष दिलीप हनुमंते रा़ गजानननगर, पंकज आंजीकर (२१) रा़ गजानननगर आणि साजीद मुश्ताक शेख (३२) रा़ महादेवपुरा यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून ५० हजार रुपये रोख, पाच मोबाईल संच, पाच मोटरसायकल असा एकूण ४ लाख ४१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी मुंबई जुगार बंदी कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये आरोपींना अटक करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, एस़पी़ मुल्ला, अशोक साबळे, संजय मानते, नामदेव किटे, विवेक धनुले, विवेक बन्सोड, हरिदास काकडे व दिनेश तुमाने यांच्या विशेष पथकाने पार पाडली़(प्रतिनिधी)