ट्रॅव्हल्स-कार अपघातात सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:27 AM2018-05-13T00:27:14+5:302018-05-13T00:27:14+5:30

वर्धा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्स व कार अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

Seven injured in a travel-car crash | ट्रॅव्हल्स-कार अपघातात सात जण जखमी

ट्रॅव्हल्स-कार अपघातात सात जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देट्रॅव्हल्स उलटली : रस्त्याखाली असलेल्या नालीत कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : वर्धा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्स व कार अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
पोलीस सुत्रानुसार, एमएच ३२ क्यू २१२६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सची एमएच ३२ वाय ४४१८ क्रमांकाच्या या कारशी समोरासमोर धडक झाली. यात जोरात ब्रेक दाबल्यामुळे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्याखाली ४ फुट खोलीत पडली. कापलेल्या झाडाच्या बुंध्याला ट्रॅव्हल्स अडकल्यामुळे मोठा अपघात झाला नाही. या अपघातात ट्रॅव्हल्समधील ६ ते ७ लोकांना काही प्रमाणात दुखापत झाली. जवळपास ४० प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये होते. इतरांना किरकोळ दुखापत झाली.
नागपूरकडून वर्धेकडे जाणारी ट्रॅव्हल्स ही वशीम बसीर सौदागर हे चालवित होते. त्यांना किरकोळ मार लागला. कार चालक पसार झाला असून कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. कारचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले तर ट्रॅव्हल्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सदर अपघात वर्धा- नागपूर रोडवर पवनार लगत असलेल्या पेट्रोलपंपाच्या वळणावर झाला असून वर्धेकडून पवनारकडे भरधाव वेगाने कार आल्यामुळे ट्रॅव्हल्सला नियंत्रण करणे कठीण झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक नियंत्रणासह पंचनामा सुरू आहे. सदर वळणावरील या महिन्यातला हा दुसरा अपघात असून या आधी दुचाकी कारला धडकून दोघे गंभीर जखमी झाले होते. राष्ट्रीय महामार्ग ३६१ ची कामे सुरू असल्यामुळे खोदलेला रोड व तोडलेल्या झाडाचे बुंधे अपघाताला कारणीभूत ठरताना दिसतात. कार ही अजित चौधरी, वर्धा यांच्या नावावर आहे.
 

Web Title: Seven injured in a travel-car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात