देवळीत पावणेपाच लाखांचा रेतीसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:16 PM2017-08-24T22:16:18+5:302017-08-24T22:17:37+5:30

येथील शहर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेला पावणेपाच लाख रुपयांचा रेतीचासाठा जप्त करण्यात आला.

Seven lakhs of sand seized in Deolati | देवळीत पावणेपाच लाखांचा रेतीसाठा जप्त

देवळीत पावणेपाच लाखांचा रेतीसाठा जप्त

Next
ठळक मुद्देतहसीलदाराचे धाडसत्र : शहर परिसरात आठ ठिकाणी कारवाई; रेती साठेबाजांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथील शहर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेला पावणेपाच लाख रुपयांचा रेतीचासाठा जप्त करण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते पंकज तडस यांच्या तक्रारीवरुन तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत ही कारवाई केली. या कारवाईमुळे देवळी व परिसरात रेतीचे मोठ्या प्रमाणात साठे असणाºयांचे धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार, या परिसरातील अंदोरी, तांबा व इतर भागातून वर्धानदीच्या रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यात येत होती. शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल चूकवून रात्रंदिवस हा गोरखधंदा सुरू होता. याबाबतची तक्रार पंकज तडस यांनी तहसीलदार यांच्याकडे करून कारवाईची मागणी केली होती. मौका चौकशी करून रेती साठ्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली होती; परंतु या सर्व कारवाईस विलंब होत असल्याने तडस यांनी जिल्हाधिकाºयांना याबाबत अवगत केले होते.
कारवाईला गती मिळाल्याने तहसीलदार जाधव यांच्या नेतृत्वात शहर परिसरातील आठ ठिकाणी धाडसत्र राबविले. या कारवाईत पावणेपाच लाख रुपयांची १३७ ब्रास रेती जप्त करण्यात आली.
यामध्ये सचिन धांडे यांचे घरामागील ३ ब्रास, रमेश सोनोने यांचे घरासमोरील १३ ब्रास, दिवाकर आडे यांच्या घरामागील ओपन स्पेस मधील ५० ब्रास, नांदोरा रोडवरील देशमुख यांचे गोडाऊन जवळील ११ ब्रास, मिरणनाथ मंदिर सामोरील ओपन स्पेस मध्ये ५ ब्रास, श्रावण मरघाडे यांच्या घरालगत ५ ब्रास, मिरणनाथ मंदिर देवस्थान सामोर १० ब्रास तसेच नांदोरा रोडवरील तेलरांधे यांच्या घराजवळ ४० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून या रेतीच्या किंमतीचा अहवाल देण्यास सांगितले आहे.
महसूल विभागाच्यावतीने जप्त करण्यात आलेल्या रेतीच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. परिसरातील २ कि़मी. अंतरावर अश्याच प्रकारचे अनेक साठे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे तसेच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. या कारवाई संदर्भात झालेल्या तक्रारीची नागरिकांत खमंग चर्चा आहे.

Web Title: Seven lakhs of sand seized in Deolati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.