केमिकल्सचे सात टँकर्स जप्त

By admin | Published: June 25, 2014 12:35 AM2014-06-25T00:35:20+5:302014-06-25T00:35:20+5:30

एका टँकरमधील केमिकल पाईच्या सहायाने दुसऱ्या टँकरमध्ये भरून घोळ करीत असल्याचा संशय नारिकांना आला. यावरून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे टँकर

Seven tankers of chemicals were seized | केमिकल्सचे सात टँकर्स जप्त

केमिकल्सचे सात टँकर्स जप्त

Next

सेलडोह शिवारातील घटना : अफरातफरीचा नागरिकांचा आरोप
सेलू / सेलडोह : एका टँकरमधील केमिकल पाईच्या सहायाने दुसऱ्या टँकरमध्ये भरून घोळ करीत असल्याचा संशय नारिकांना आला. यावरून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे टँकर जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले आहे. ही घटना सेलडोह शिवारात सोमलगढ येथे सामेवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघड झाली. ही कारवाई रात्री १ वाजेपर्यंत सुरू होती. या टँकरमध्ये कोणते केमिकल होते याचा तपास पोलीस करीत आहेत.
सोमलगढ शिवारात सात टँकर आपसात टँकरमधील केमिकलची देवाण घेवाण करीत होते. याकडे गावातील नागरिकांचे लक्ष गेले. त्यांना यात मोठी अफरातफर होत असल्याचा संशय आला. त्यांनी टँकरजवळ उभ्या असलेल्यांना विचारणा केली असता या टँकरमध्ये डांबर असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांचा संशय आणखीच बळावल्याने नागरिकांनी घटनेची माहिती माहिती सिंदी (रेल्वे) पोलीस व सेलू तहसीलदारांना दिली. तहसीलदारांच्या सूचनेवरून नायब तहसीलदार यादव घटनास्थळी दाखल झाले; मात्र सिंदी पोलीस येऊन परत गेले. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेत कारवाई करीत सातही टँकर सिंदी पोलिसांना जप्त करण्याच्या सूचना नायब तहसीलदारांनी केल्या. पोलिसांनी सातही टँकर जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात नेले.
पोलिसांनी जप्त केलेल्या टँकरचे क्रमांक एम एच १४ केपी ७८०४, एम एच १४ केवी ७८०३, एमएच १४ बीजे १९६४, एमएच ०४ एच ६७६५ व एमएच ०६ ए ४९२१ आहेत. घटनास्थळी सापडलेल्या अन्य दोन टँकरवर क्रमांक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या टँकरमध्ये काय होते याचा उलगडा अद्याप झाला नाही; मात्र या फर्निश केमिकल असल्याचा संशय नायब तहसीलदारंनी व्यक्त केला आहे. हे टँकर पोलिसांनी जप्त केल आहेत. ते ठाण्याच्या आवारात उभे आहेत. त्यात काय केमिकल होते याची तपासणी करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती ठाण्यातून देण्यात आली आहे. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)

Web Title: Seven tankers of chemicals were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.