Wardha | ग्रामीण रुग्णालयात भीषण आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

By चैतन्य जोशी | Published: October 13, 2022 01:27 PM2022-10-13T13:27:39+5:302022-10-13T13:44:05+5:30

रुग्णालयात आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

Severe fire due to short circuit in rural hospital samudrapur, loss of life was avoided due to vigilance of citizens | Wardha | ग्रामीण रुग्णालयात भीषण आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Wardha | ग्रामीण रुग्णालयात भीषण आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

googlenewsNext

समुद्रपूर (वर्धा) : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना १३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

समुद्रपूर शहरात नव्यानेच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने केबलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी आणि नागरिकांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन सिलिंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.

रुग्णालयात आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. सर्व रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडले. त्या वेळेस २० ते २५ रुग्ण रुग्णालयात भरती होते. या आगीत विशेष काहीही नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत आग विझविण्यासाठी धडपड केली. दरम्यान काही वेळासाठी समुद्रपूर गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली

Web Title: Severe fire due to short circuit in rural hospital samudrapur, loss of life was avoided due to vigilance of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.