सांडपाणी सोडले जातेय बोर नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:10 AM2019-09-03T00:10:26+5:302019-09-03T00:10:49+5:30
लोक प्रतिनिधीच्या पुढाकाराने शासन दरबारात या नगरीचे धार्मिक महत्त्व पटवून देऊन बोररीराच्या सौंदर्यीकरण घाट बांधण्यासाठी अडीच कोटींच्या आसपास निधी मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाट झाल्याने भाविकांना याचा लाभ होणार आहे. घाटाच्या पायथ्याशी गावातील सांडपाणी येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : विदर्भाची पंढरी तीर्थक्षेत्र घोराड येथील बोर नदीतीराचे रुपडे पालटले असले तरी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या खर्चात बोर घाट दूषितच राहणार आहे
पहिल्यांदा विदर्भाच्या पंढरीचे महत्त्व लक्षात घेऊन लोक प्रतिनिधीच्या पुढाकाराने शासन दरबारात या नगरीचे धार्मिक महत्त्व पटवून देऊन बोररीराच्या सौंदर्यीकरण घाट बांधण्यासाठी अडीच कोटींच्या आसपास निधी मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाट झाल्याने भाविकांना याचा लाभ होणार आहे. घाटाच्या पायथ्याशी गावातील सांडपाणी येते. याचा मार्गही बदलाविला नसल्याने नदीचा प्रवाह बंद झाल्यानंतर हे सांडपाणी घाटाच्या ठिकाणी साचणार आहे. यामुळे भाविकांची स्रान करण्याची इच्छा या सांडपाण्यामुळे अधुरी राहण्याची शक्यता आहे.
सुरू असलेल्या घाटाच्या बांधकामावर ग्रामस्थ व भाविक समाधान व्यक्त करीत असले तरी सांडपाणी व्यवस्थापन केले नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामात हे काम का करण्यात आले नाही, असा प्रश्न केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आजवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी गावाच्या विकासावर भर दिला; पण नदीचे निर्मळ पात्र दूषित होत असताना याकडे दुर्लक्ष केले. आता तरी सौंदर्यीकरण करीत असताना सांडपाण्याचा मार्ग बदलविला जाईल, असा कयास लावला जात होता; मात्र घोराडकरांनी पाहिलेले स्वप्न सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने दिवास्वप्न ठरले.
बोर तीरावर वसलेले हे गाव दोन संतांच्या वास्तव्याने संतभूमीच नव्हे, तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख झाली. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन कायापालट करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलले म्हणून ग्रामस्थांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अजून थोडाफार निधी मंजूर करून हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावा. यात नदीपात्रात जाणारे सांडपाणी घाटात न सोडता दूरवर अंतरावर नेण्यासाठी प्रयत्न करावा, सेलूकडून मंदिराकडे येणाºया रस्त्याचे रुंदीकरण करावे व मंदिर सभोवतालच्या भागाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
येथे रामनवमी यात्रा, कार्तिक यात्रा, संत केजाजी व संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव, आषाढी एकादशी यात्रा आदी धार्मिक उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
रूपडे पालटले पण....
४बोरतीरावर पुंडलिकाचे मंदिर आहे. याच मंदिरामागे गावातील सांडपाणी सोडलेले आहे. येथेच घाटाचे प्रशस्त असे बांधकाम केले आहे; पण हे सांडपाणी नदीच्या पात्रात साचत असून काही अंतरावर बोर नदीपात्रात हनुमानाचे मंदिर आहे. त्यामुळे सदोदित या ठिकाणी दूषित पाणी संग्रहित होते. कोट्यवधी रुपये खर्च करून बोरतीराचे रुपडे पालटले; पण सांडपाण्याची समस्या कायम आहे. या स्थळाला बोरतीर्थ असे संबोधले जात असून ते पावित्र्य कायम ठेवण्यासाठी या विकास प्रकियेत या कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.