सेवाग्राम आश्रम ते हुतात्मा स्मारक तिरंगा यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:29 PM2017-08-31T22:29:05+5:302017-08-31T22:29:20+5:30
चले जाव आंदोलनाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सेवाग्राम आश्रम ते वर्धा शहर हुतात्मा स्मारक तिरंगा यात्रेचे आयोजन....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चले जाव आंदोलनाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सेवाग्राम आश्रम ते वर्धा शहर हुतात्मा स्मारक तिरंगा यात्रेचे आयोजन खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात गुरूवारी करण्यात आले. नवयुवकांना स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व समजावे व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरिता राष्ट्रभक्ती निर्माण करणे हा तिरंगा यात्रेचा उद्देश्य होता. तिरंगा यात्रेला सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त जाधव व सहकाºयांनी हिरवी झेंडी दाखवून मोटर सायकल रॅलीला प्रारंभ केला.
खा. तडस, आ.डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपाचे नेते सुधीर दिवे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजयुमोचे अंकुश ठाकूर, वरुण पाठक, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, प्रणव जोशी, हरिश तडस, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बुर्ले, वर्धेचे नगरसेवक व नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी, बजरंग दल व विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांनी स्वत: मोटर सायकल चालवून तिरंगा घेत शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम पूर्ण केला.
सेवाग्राम येथून प्रारंभ झालेली तिरंगा यात्रा गांधी पुतळा मार्गे आरती चौक, शिवाजी चौक, वंजारी चौक, शास्त्री चौक, मुख्य मार्केट, इतवारा मार्गे मार्गक्रमण करून हुतात्मा स्मारक आंबेडकर पुतळा चौक येथे पोहोचली. लॉयन्स कल्बचे पदाधिकारी राजू पडोळे, डॉ. विनोद अदलखिया यांनी हुतात्मा स्मारक येथे तिरंगा यात्रेचे स्वागत केले. हुतात्म्यांना वंदन करून व हारार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर खा. तडस, आ.डॉ. भोयर, सुरेश वाघमारे, सुधीर दिवे, नगराध्यक्ष तराळे, अटल पांडे, डॉ. अदलखिया यांनी समयोचित मार्गदर्शन केले. मान्यवरांनी तिरंगा यात्रा उपक्रमाबद्दल गौरवउद्गार काढले.
हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रमाचे संचालन राजू पडोळे यांनी केले तर आभार प्रशांत बुर्ले यांनी मानले. राष्ट्रगीत तथा भारत मातेच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तिरंगा यात्रा व कार्यक्रमाला अंकुश ठाकूर, वरुण पाठक, प्रणव जोशी, हरिष तडस, अंजिक्य तांभेकर, अटल पांडे, अभिषेक त्रिवेदी, विशाल चौधरी, कुणाल खंगार, राजिक शेख, तरुण शर्मा, संदीप मडावी, गौरव गावंडे, दिनेश डकरे, अनिल धोटे, मंगेश मांगलेकर, अविनाश बाभूळकर, रितेश साटोणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.
यात्रेचे सलग दुसरे वर्ष
तिरंगा यात्रेचे वर्धा लोकसभा मतदार संघात सलग दुसºया वर्षी आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही वर्षी तिरंगा यात्रेच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा देत कौतुक केले आहे, हे विशेष!