शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:07 AM2021-11-26T11:07:18+5:302021-11-26T11:14:00+5:30

पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपुूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

Sexual abuse of a minor girl by a tuition teacher | शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती

शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रकृती बिघडल्याने प्रकार उघडकीसतळेगाव ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : १६ वर्षीय पीडितेचे शिकवणी चालकाने वारंवार बळजबरीने लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

१६ वर्षीय पीडितेची आठव्या वर्गापासून राहुल भारती या शिक्षकाकडे शिकवणी होती. मार्च महिन्यापासून ऑफलाइन शिकवणी सुरू झाली होती. आरोपी राहुल भारती हा पीडितेचा गृहपाठ तपासत असताना तिच्याशी नेहमी असभ्य वर्तन करून तिला मारहाण करायचा. सप्टेंबर महिन्यात पोळा सण असल्याने शिकवणीला दोन दिवस सुटी होती. ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपुूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर राहुल भारती याने १२ सप्टेंबर रोजीदेखील पीडितेचे शोषण केले. २० नोव्हेंबर रोजीही बळजबरीने अत्याचार केला. प्रकृती बिघडल्याने पीडितेच्या आई-वडिलांना पीडितेला आर्वी येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी राहुल भारती याच्याविरुद्ध ३७६, ३२३, ५०६ भादंवि सहकलम ४, ६ लैंगिक बाल संरक्षण अधिनियम २००२ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Sexual abuse of a minor girl by a tuition teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.