लोकसहभागातून सावलीची शाळा डिजिटल
By admin | Published: February 11, 2017 01:20 AM2017-02-11T01:20:43+5:302017-02-11T01:20:43+5:30
देवरी तालुक्यातील डोंगरगाव केंद्रातील सावली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली.
दोन लाख वर्गणी : शाळेतील अनेक विकास कामांत हातभार
लोहारा : देवरी तालुक्यातील डोंगरगाव केंद्रातील सावली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली. दोन डिजिटल वर्गखोल्याचे उद्घाटन व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह पवार होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेश रहिले, विशेष अतिथी म्हणून सरपंच प्रभूदयाल पवार, उपसरपंच निलेश शेंडे, पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले, तंमुस अध्यक्ष संजय बिंझलेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा मरस्कोल्हे, उपाध्यक्ष संजय मेहर, गटशिक्षणाधिकारी बी.डी. साकुरे, केंद्रप्रमुख ए.आर.शेंडे, सी.एम. बैस, एम.एम.राऊत, विनोद बहेकार, ग्राहक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, डुडेश्वर गहाणे, कमलसिंग राठोड, चंद्रप्रकाश बहेकार, ओमप्रकाश शेंडे, खालील खा, गोविंद महाले, छन्नेश्वरी वैद्य, पूनम राऊत, नजलूनानीसा शेख, रेखा चुटे, सरिता बिंझलेकर, आशा मुनेश्वर उपस्थित होते.
प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक संदीप तिडके यांनी सांगितले की मागील चार वर्षापासून सावली शाळेने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीचा नवा उच्चांक गाठला त्यावर माहिती दिली. २०१२-१३ मध्ये गावची शाळा आमची शाळा उपक्रमात तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. २०१३-१४ मध्ये द्वितीय क्रमांक, २०१३-१४ मध्ये विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातून प्रथम, २०१५-१६ मध्ये स्वदेशीमध्ये जिल्ह्यातून प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला. गुणवत्तेमध्ये २०१५-१६ मध्ये उच्च प्राथमिक गटात अमन मडावीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षेत २०१४-१५ मध्ये आरती राऊत हिने तिसरा क्रमांक प्राप्त केल्याचे सांगितले. आ. पुराम यांनी लोकवर्गणीतून २ लाख रुपये जमा करुन त्याद्वारे प्रवेशद्वार, आधुनिक विद्युत व्यवस्था, डिजिटल वर्गखोली, संपूर्ण शाळेचे आईल पेट, संगणक दुरुस्ती व दिड हजार लोकांकरिता सामूहिक भोजन कार्यक्रम, ४०० महिलांचा मेळावा यासारखे विकासात्मक कामे हाती घेऊन समाजात नवा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून पवार यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संचालन एच.एम.राऊत यांनी तर आभार रमेश ताराम यांनी मानले. यशस्वितसाठी सहायक शिक्षक नंदकिशोर शेंडे, गणेश ताराम, एच.एम.राऊत, प्रवीण सोनटक्के, वर्षा वालदे, विद्यार्थी व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)