सोनेगाव (आबाजी) येथे खासदारांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:53 PM2018-04-22T23:53:06+5:302018-04-22T23:53:06+5:30

पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप २०१८ मध्ये सहभागी वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी, सेलू व कारंजा तालुक्यात बक्षिस जिंकण्याकरिता जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक गावात श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य लोकसहभागातून प्रारंभ झाले आहे.

 Shamdan (Abaji) MPs did the work of Shramdan | सोनेगाव (आबाजी) येथे खासदारांनी केले श्रमदान

सोनेगाव (आबाजी) येथे खासदारांनी केले श्रमदान

Next
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : गाव पाणीदार करण्यासाठी आबालवृद्धही मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप २०१८ मध्ये सहभागी वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी, सेलू व कारंजा तालुक्यात बक्षिस जिंकण्याकरिता जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक गावात श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य लोकसहभागातून प्रारंभ झाले आहे. याच स्पर्धेचा एक भाग म्हणून देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) तिर्थक्षेत्र परिसरात खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जलसंधारणाच्या तत्वावर चळवळ उभारल्यास सर्व गावे पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही. हे महत्त्वाचे कार्य जलतज्ञ माधव कोटस्थाने यांच्या मार्गदर्शनात सेलू तालुक्यातील तामसवाडा येथे नाला खोलीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. यामुळे आपल्या गावातील आपले हक्काचे पावसाचे पाणी आपल्याच गावात टिकून राहण्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना, पाणी फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन सोबतच सामाजिक संघटनांकडून प्रारंभ केलेल्या या कार्यात सर्व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी केले.
पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील देवळी तालुक्यातील सोनेगाव येथे श्रमदान करण्यासाठी खासदारांसह जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, जि.प. सदस्य वैशाली येरावार, प्रवीण सावरकर, जयंत येरावार, दीपक फुलकरी, समीर देशमुख, देशमुख, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, प्रवीण जैन, तहसीलदार भागवत, पोलीस निरीक्षक ठाकूर, न्यू आर्टस महा. पुलगाव, एसएसएनजे देवळीचे प्राध्यापक व विद्यार्थी, तथा स्थानिक जि.प. शाळेचे शिक्षक व विध्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title:  Shamdan (Abaji) MPs did the work of Shramdan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.