आधी रचला बालविवाह अन् नंतर खावी लागली तुरुंगाची हवा; पतीसह एका महिलेस बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 11:11 AM2022-08-06T11:11:41+5:302022-08-06T11:24:17+5:30

पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघड

She got pregnant and broke the child marriage scandal | आधी रचला बालविवाह अन् नंतर खावी लागली तुरुंगाची हवा; पतीसह एका महिलेस बेड्या

आधी रचला बालविवाह अन् नंतर खावी लागली तुरुंगाची हवा; पतीसह एका महिलेस बेड्या

Next

वर्धा : बालविवाह लावून देणे तसेच बालविवाह करणे हा गुन्हा मानला जातो. तरीही ही विकृत मानसिकता आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. असाच धक्कादायक प्रकार हिंगणघाट शहरात उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. अवघ्या १४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावून तिला गर्भवती केल्याची लाजिरवाणी घटना पीडिता गर्भवती राहिल्याने उघडकीस आली.

या प्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याची माहिती दिली. हिंगणघाट शहरातील रहिवासी अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी फुला देसू कुराडे (५०) हिने आरोपी जीवन रामकिसन देवतळे (३५) याच्याशी बालविवाह लावून दिला. आरोपी जीवन याने पीडितेवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक व समाजमन सुन्न करणारा प्रकार उजेडात आला.

या प्रकरणाची माहिती तत्काळ हिंगणघाट येथील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीचे बयाण नोंदवून आरोपी जीवन देवतळे आणि फुला देसू कुराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. पीडितेवर हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: She got pregnant and broke the child marriage scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.