अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:10 PM2018-01-09T22:10:50+5:302018-01-09T22:11:10+5:30

वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे.

Shelter of unhappy birds | अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

Next
ठळक मुद्देसिमेंट काँक्रिटचे जंगल वाढतीवर : वृक्ष व पक्षीप्रेमींकडून वर्तविली जातेय चिंता

आॅनलाईन लोकमत
वर्धा : वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा शहरात वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल व सुरू असलेली वृक्षतोड यामुळे अनेकांना भुरळ लावणाऱ्या पक्ष्यांचा निवाराच हिरावला जात आहे.
भारतीय संस्कृतीत झाडाचे वेगळे महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांनीही वातावरणाच्या शुद्धतेसाठी झाडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मात्र, मनुष्यासह प्राणी व पक्ष्यांना प्राणवायू देणाºया मोठाल्या वृक्षांची विकासाच्या नावालाखी कत्तल केली जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर वर्धा शहरासह परिसरात झपाट्याने सिमेंट काँक्रीटचे जंगलही वाढत असल्याचे वास्तव आहे. शहर परिसरातील अवैध वृक्ष कत्तल आणि दिवसेंदिवस वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल यामुळे सध्या शहराच्या आजूबाजूला व शहरात नेहमी दिसणाऱ्या विविध व आकर्षक पक्ष्यांचा निवाराच हरवित आहे. त्यामुळे एक एक रोपट लावून त्याचे संगोपन करणारे वृक्ष प्रेमी आणि पक्षी प्रेमींकडून चिंता वर्तविली जात आहे.
निवृत्त अभियंत्यांचा ‘तो’ प्रयोग पुन्हा करणे गरजेचे
विकास कामादरम्यान ज्या ठिकाणी विकास काम होत आहे तेथील कामही पूर्ण व्हावे आणि त्या परिसरातील वृक्ष जीवंत रहावे या उद्देशाने सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी एका कनिष्ठ अभियंत्यांनी शहरात अनोखा प्रयोग केला होता. त्यांचा तो प्रयोग यशस्वीही झाला. वृक्षांचे महत्त्व ओळखून बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता विकास गुंजेवार यांनी जिल्हा न्यायालय परिसरात विकास कामात बाधा ठरणारे पिंपळाचे वृक्ष त्याकाळात विविध यंत्रांच्या सहाय्याने मुळासकट उपडून ते दुसºया ठिकाणी लावले. सध्या हे वृक्ष जीवंत असून त्यांचा तो प्रयोग वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने फायद्याचा असल्याने पुन्हा नव्या जोमाने तो सध्या राबविण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात.
वास्तुची जागा आणि झाडं
ज्या जागी तुळशीचे रोप असेल तेथे घर बांधणे केव्हाही उत्तम असते. कारण तुळस आपल्या चारी बाजूचे ५० मीटरपर्यंतचे वातावरण शुद्ध ठेवते. शास्त्रातही हे रोप फारच पवित्र मानण्यात आले आहे.
घराजवळ नेहमी अशोक किंवा शमीचे झाड लावल्याने विविध दोष दूर होतात.
आंबा, कडूनिंब, बेहेडा, पिंपळ, अगस्त, चिंच ही झाडे घराजवळ असणे चांगले नसते.
ज्या जमिनीवर पपई, आवळा, पेरू, डाळिंब, पलाश आदी वृक्ष जास्त प्रमाणात असतात ती जागा वास्तुशास्त्रात चांगली मानली जाते.
ज्या वृक्षांवर फुलं येतात आणि वेल व वनस्पती सरळ वाढत जाते ती जमीनसुद्धा वास्तुशास्त्रात चांगल मानले जाते.

Web Title: Shelter of unhappy birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.