शिवसेना नगर पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणारअशोक शिंदे यांची माहिती : कार्यकर्त्यांना दिल्या तयारीला लागण्याच्या सूचना
By admin | Published: July 14, 2016 02:15 AM2016-07-14T02:15:54+5:302016-07-14T02:15:54+5:30
आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील विश्रामगृहात शिवसेना कार्यकारिणी बैठक पार पडली.
वर्धा : आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील विश्रामगृहात शिवसेना कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी या दिशेने तयारीला लागण्याच्या सूचना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते अशोक शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढण्याकरिता इच्छुकांनी संबंधित विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा प्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यातील आर्वी, पुलगाव, देवळी, वर्धा, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषद निवडणूक डिसेंबर महिन्यात होऊ घातल्या आहे. याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, तालुका प्रमुख, नगरपरिषद क्षेत्रातील शहर प्रमुख, उपशहर प्रमुख तसेच शहर संघटक या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, उपजिल्हा प्रमुख, हिंगणघाट भारत चौधरी, उपजिल्हा आर्वी प्रमुख बंडू कडू, उपजिल्हा प्रमुख देवळी आशिष पांडे, देवळी विधानसभा क्षेत्र संघटक विनोद बाभूळकर, आर्वी तालुका प्रमुख महेश चौधरी, देवळीचे तालुका प्रमुख महेश जोशी, हिंगणघाट तालुका प्रमुख अभय वानखेडे, वर्धा तालुका प्रमुख बाळा मिरापूरकर, उपतालुका प्रमुख नानाभाऊ गोमासे, पंकज झोरे, सुधीर काकडे, राजेश त्रिवेदी, गणेश वाघमारे, युगल अवचट, खुशाल राऊत, नितिन राहणे तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी निवडणूक संबंधीत चर्चा करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)