शेतकºयांच्या अडचणीत धावून गेली शिवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:06 AM2017-10-28T01:06:43+5:302017-10-28T01:06:58+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक त्रुट्या आहेत. त्या दूर करण्यासाठी व कर्जमाफीसाठी पात्र ठरणारा एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ...

Shiv Sena ran away in the face of farmers | शेतकºयांच्या अडचणीत धावून गेली शिवसेना

शेतकºयांच्या अडचणीत धावून गेली शिवसेना

Next
ठळक मुद्देविविध ठिकाणी उघडले मार्गदर्शन केंद्र : शेतकरी कर्जमाफी योजनेतील अडचणी करणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक त्रुट्या आहेत. त्या दूर करण्यासाठी व कर्जमाफीसाठी पात्र ठरणारा एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मार्गदर्शन केंद्रातून हवालदिल शेतकºयांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे.
शिवसेनेच्यावतीने प्रत्येक तालुक्यांतील तहसील कार्यालयसमोर विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना २०१७ ची घोषणा केली. परंतु, अजुनही यातील घोळ कायम आहे. शेतकºयांना मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. पण, अनेकांचे नावच यादीत नाहीत. आॅनलाईन प्रक्रियेची अडचण काही शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवत आहे. अडचण येत असलेल्या शेतकºयांनी शिवसेना कर्जमाफी मदत केंद्रात नोंद करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वर्धा तहसील कार्यालय समोरील मदत केंद्रात शुक्रवारी दिवसभºयात २५ शेतकºयांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश सराफ, तालुका प्रमुख गणेश इखार, दिलीप भुजाडे, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, शहर प्रमुख विशाल वैरागडे, उपशहर प्रमुख खुशाल राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 

Web Title: Shiv Sena ran away in the face of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.