पीक विम्याकरिता शिवसेना घेणार आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:21+5:30
शेतकऱ्यांनी पिकांची हमी म्हणून पीक विमाही उतरविला. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. परंतु, कंपन्या नुकसान भरपाई देण्यास कुचराई करीत आहे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँकेने पीक विम्याची रक्कम कपात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवूनही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, असा निर्णय शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंतराव गुढे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला युवासेना प्रदेश कार्यकारिणी व सिनेट सदस्य रुपेश कदम, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख राजकुमार दीक्षित, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, बाळू शहागडकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुधा शिंंदे, उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्ह्यातील शेतकरी सध्या ओल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मात्र, प्रशासनाच्या लेखी जिल्हा सुकाळ असल्याने मोठी अडचण झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची हमी म्हणून पीक विमाही उतरविला. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. परंतु, कंपन्या नुकसान भरपाई देण्यास कुचराई करीत आहे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँकेने पीक विम्याची रक्कम कपात केली आहे. ती रक्कम संबंधित पीक विमा कंपनीकडे वळतीही करण्यात आली. त्यामुळे आता बँकांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांकडून ती रक्कम वसूल करणे अभिप्रेत आहे. याकडे शासनाचेही दुर्लक्ष असून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संकाटावर मात करण्यासाठी त्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता आता शिवसैनिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना निकषानुसार शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी अनंतराव गुढे यांनी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे जाहीर केले होते;पण अद्याप शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला दीडपट भाव मिळाला नाही. यासाठी केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. गृहनिर्माण क्षेत्रात अपुऱ्या बांधकामासाठी पतपुरवठा केला जातो मात्र, शेतकऱ्यांबाबत बँका उदासिन आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी युवासेना कार्यकारिणी व सिनेट सदस्य रुपेश कदम, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, बाळू शहागडकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुधा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन दिलीप भुजाडे यांनी केले. बैठकीला उपजिल्हा प्रमुख भारत चौधरी, ज्ञानेश्वर ढगे, सुनील पारसे, प्रमोद भटे, चंदू पंडित, रवींद्र लढी, गणेश पांडे, गणेश इखार, संदीप टिपले, अमोल चरडे, चंद्रशेखर नेहारे, किरण मलमकर, वर्षा हटवार, जयश्री भुरे, वंदना भुते, प्रशांत झाडे, प्रमोद देवढे, विलास निवल, महेश जोशी, पंकज झोरे, खुशाल राऊत, अमित बाचले, योगेश इखार, सतीश नवरखेले, विद्याधर माथने, नानाभाऊ माहुरे, घनश्याम वडतकर,गौरव भेलाये, मुन्ना शिंदे, सुनील डोंगरे, अमर लांजेवार, राजा मानकर, राजेश पेंदोर, महेश शास्त्री, परमार, श्याम देशमुख,संदीप चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते.