शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाचा वाद चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:48 PM2018-01-15T22:48:17+5:302018-01-15T22:48:46+5:30

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा वाद चांगलाच उफाळून आला असून जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्या विरूध्द येथील शिवसैनिकांनी एल्गार पुकारला.

Shiv Sena's chief of the district will get angry | शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाचा वाद चिघळणार

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाचा वाद चिघळणार

googlenewsNext
ठळक मुद्देसंपर्क प्रमुखाविरोधात एल्गार : १५ शिवसैनिकांचे मुंडण

आॅनलाईन लोकमत
आर्वी : शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा वाद चांगलाच उफाळून आला असून जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्या विरूध्द येथील शिवसैनिकांनी एल्गार पुकारला. सोमवारी १५ शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी येथील शिवाजी चौकात शिरमुंडण करून निलेश देशमुख यांना वर्धा जिल्हा प्रमुख पदावर कायम ठेवा अशी मागणी केली आहे.
जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती होताच अनंत गुढे यांनी पक्षवाढीकरिता प्रयत्न सुरू केले आहे. यात त्यांनी दोन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला. वर्धा शहर प्रमुख राजेश सराफ यांच्यावर वर्धा व हिंगणघाट विधानसभेची जबाबदारी तर, पुलगाव-देवळी व आर्वी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी बाळा शहागडकर यांच्यावर सोपविण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रक्रियेत निलेश देशमुख हे डावलल्या जात असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारे शिवसैनिक दुखावले. अशा १५ शिवसैनिकांनी शिर मुंडण करून ते केस अनंत गुढे यांना पाठविणार आहे. शिरमुंडण करणाºयात शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश आजणे, शहरप्रमुख नरेश वडणारे, उपजिल्हा प्रमुख शेख मोहसिन, प्रमोद सोनटक्के, अजय वाघ, तालुका संघटक पिंटू छंगाणी, शाखा प्रमुख प्रफुल सोनोणे, उपशहर प्रमुख धिरज लाडके, विजय भोळे, उपतालुका प्रमुख चिंधुजी झामरे, कैलाश ईखार, युवासेना उपतालुका प्रमुख मनिष पाटील, व्यापारी सेना प्रमुख राजु पालीवाल, शिवसैनिक भुषण पुरी, दिपक वाकोडकर यांचा समावेश आहे. यावेळी सवीता राजेंद्र पुरी, संगीता वाकोडकर, जान्हवी सोळंकी, मंदा बाणाबाकोडे, पवन खोंडे, मनिष अडसड, बाळु अवथनकर, आनंद गुल्हाणे, अभय ढोले तथा शिवसैनिकांनी निषेध नोंदविला आहे.

Web Title: Shiv Sena's chief of the district will get angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.