कालवा झिरपल्याने शिवपांदण पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:31 AM2018-03-07T00:31:11+5:302018-03-07T00:31:19+5:30

हमदापूर आणि शिवनगर सीमेवरून बोरधरणाचा कालवा काढण्यात आला आहे. मात्र या कालव्याच्या पाटचऱ्या आणि उपकालव्याची स्वच्छता केलेली नाही.

Shiva Pandan is submerged due to canal water | कालवा झिरपल्याने शिवपांदण पाण्याखाली

कालवा झिरपल्याने शिवपांदण पाण्याखाली

Next
ठळक मुद्देपाटचऱ्यां बुजल्या : शेतकऱ्यांना होतो मनस्ताप

ऑनलाईन लोकमत
सेवाग्राम : हमदापूर आणि शिवनगर सीमेवरून बोरधरणाचा कालवा काढण्यात आला आहे. मात्र या कालव्याच्या पाटचऱ्या आणि उपकालव्याची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे पाणी लगतच्या शेतात शिरत आहे. तसेच शिवनगर पांदण पाण्याखाली आली आहे.
हा कालवा पुढे बावापूर, रज्जकपूर, देरडा येथून जातो. कालव्याच्या पाण्यामुळे येथील शेतकºयांना लाभ झाला. रबी हंगामात येथील शेतकरी पिके घेऊ लागली. काही प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निकाली निघाला. मात्र लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शेतकºयांना या कालव्याचा आता त्रास होत आहे. उपकालव्याचे पाणी लगतच्या शेतात वाहत आहे. त्यामुळे रबी पिके प्रभावीत होत आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय होत आहे. दिवसाला लाखो लिटर पाणी वाहत असताना याकडे कुणाचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपकालव्याच्या पाण्यामुळे शिवपांधन चिखलमय झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना ये-जा करताना अडचण येत आहे. सरकारी यंत्रणेच्या गलथान कारभाराचा फटका शेतकरी सहन करीत आहे. सिंचनाकरिता सोडण्यात आलेल्या पाण्याचा याप्रकारे अपव्यय होत आहे.
बावापूर येथील प्रकार
उपकालवे व पाटचऱ्यांची स्वच्छता वेळेवर नसल्याने होत नसल्याने यात झुडपे वाढले आहे. गाळ साचला असल्याने बावापूर ते रज्जकपूर दरम्यान रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. पाण्याचा प्रवाह वेगवान असाल्याने शेतात पाणी शिरते. बावापूरच्या शिवपांधणीवर चिखल तयार झाल्याने आवागमन करणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या भासते. याप्रकारे पाण्याचा अपव्यय थांबविण्याची गरज आहे.

Web Title: Shiva Pandan is submerged due to canal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.