महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:10 AM2017-09-21T00:10:24+5:302017-09-21T00:10:37+5:30

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे.

On Shivsena road against Bharrinamya with inflation | महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : दैनंदिन वापरातील वस्तुंचे दर गगनाला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच निवेदनही संबंधीतांना देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटी सारख्या दुय्यम प्रश्नामध्ये व्यस्त आहे. शिवसेना सरकारचाच एक भाग असला तरी सर्व सामान्यासह गोरगरीब व शेतकºयांच्या जिव्हळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमी पुढाकार घेते.जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षात पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८१.७३ रूपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून भारनियमन कमी होताना दिसत नाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य उपाययोजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजाणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात वर्धेचे तहसीलदार मनोहर चव्हाण व सेलूचे तहसीलदार सोनोने यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी पं.स. सदस्य संतोष सेलूकर, शिवसेनेचे वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार, सेलू तालुका प्रमुख रविंद्र चव्हाण, दिलीप भुजाडे, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, सुनील पारसे, भाष्कर पराते, शहर प्रमुख विशाल वैरागडे, उपतालुका प्रमुख सागर मरघडे, मोहन येरणे, अमर गुंदी, सेलूचे मनीष व्यास, सतीश नवरखेले, विशाल व्यास, किशोर धोंगडे, अतुल जामुनकर, सुनील धोंगडे, अतुल जामुनकर, सुनील डोंगरे, लालचंद गलांडे, युवा सेनेचे मयूर जोशी, खुशाल राऊत, रवी दरवरे, अनंता साटोणे, रूपेश नगराळे, मुन्ना ठाकूर, नानाजी सोनटक्के, जगदीश कैकाडे, सतीश नवरखेडे, किशोर धोंगडे, अतुल जामुनकर, सचिन भोयर, भालचंद्र साटोणे, मोतीराम मडावी, नानाजी सोटक्के, जगदीश कैकाडे, नितीन सुरकार यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
 

Web Title: On Shivsena road against Bharrinamya with inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.