शिवशाहीला भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:19+5:30

प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २९ बी. ई. १२५९ क्रमांकाची शिवशाही बस यवतमाळ येथून प्रवासी घेऊन वर्धेच्या दिशेने येत होती. भरधाव बस सालोड हिरापूर शिवारातील वळण रस्त्यावर आली असता वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरत उलटली.

 Shivshahi's worst accident | शिवशाहीला भीषण अपघात

शिवशाहीला भीषण अपघात

Next
ठळक मुद्देसहा जण जखमी। सालोड (हिरापूर) शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यवतमाळ येथून वर्ध्याच्या दिशेने येत असलेली राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस अनियंत्रित होत उलटली. या भीषण अपघातात बस चालकासह एकूण सहा जण जखमी झाले. हा अपघात वर्धा-यवतमाळ मार्गावरील सालोड हिरापूर शिवारात झाला. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २९ बी. ई. १२५९ क्रमांकाची शिवशाही बस यवतमाळ येथून प्रवासी घेऊन वर्धेच्या दिशेने येत होती. भरधाव बस सालोड हिरापूर शिवारातील वळण रस्त्यावर आली असता वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरत उलटली. या अपघातात चैतन्य श्रीराम चालतेकर, संजय किशोर पोहणकर, अशोक बघेल, रूचित्रा गणेश राठी,विजय विपीन सरकार, महेश गजेंद्र उकेटोहणे हे जखमी झाले.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाकडे उपचाराकरिता रवाना केले. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अपघातग्रस्त वाहनावर जिवंत विद्युत तारा
अनियंत्रित झालेली शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उतरून उलटली. अपघात होताच जीवंत विद्युत तारा अपघातग्रस्त वाहनावर पडल्याने बस मध्येही विद्युत प्रवाहीत झाली होती. पण घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना वेळीच वाहनाबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title:  Shivshahi's worst accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.