धक्कादायक! दारु पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By चैतन्य जोशी | Updated: October 14, 2023 16:43 IST2023-10-14T16:41:06+5:302023-10-14T16:43:51+5:30
आर्वी तालुक्यातील घटनेने खळबळ

धक्कादायक! दारु पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारु पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आर्वी तालुक्यातील एका गावात १३ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांनी दिली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आर्वी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी १७ वर्षीय मुलीला अशपाक आणि शुभम नामक तरुणांनी कारमध्ये जबरदस्तीने बसविले. तिला गावाबाहेरील रस्त्यावर नेत कारमध्येच बळजबरीने दारु पाजली. आणि दोघांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि आर्वी पोलिसांचे एक अशी दोन पथके आरोपीच्या मागावर असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक काळे यांनी सांगितले.