दुकान आॅनलाईन; पण दुकानदार सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:49 PM2018-02-23T23:49:58+5:302018-02-23T23:49:58+5:30

स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला सुधारित धोरणांप्रमाणे आॅनलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत; पण यात बऱ्यांच त्रूटी आढळून येत आहे.

Shop online; But shopkeeper on the saline | दुकान आॅनलाईन; पण दुकानदार सलाईनवर

दुकान आॅनलाईन; पण दुकानदार सलाईनवर

Next
ठळक मुद्देपॉस मशीनमध्ये डाटा फिडींग झालीच नाही : व्यवहारात आॅफलाईन पद्धतीचा वापर

अमोल सोटे।
ऑनलाईन लोकमत
आष्टी (शहीद) : स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला सुधारित धोरणांप्रमाणे आॅनलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत; पण यात बऱ्याच त्रूटी आढळून येत आहे. यामुळे दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, दुकान आॅनलाईनवर तर दुकानदार सलाईनवर, अशी स्थिती झाली आहे. या प्रकारामुळे बरेच दुकानदार राजीनामा देण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत.
पॉस मशीनमध्ये अंगठा (थम्ब) दिल्याशिवाय धान्याचे अनुदान मिळत नाही; पण बºयाच कार्डधारकांचे थम्ब लागत नाही. यामुळे सदर लाभार्थ्यांना वंचित न ठेवता आॅफलाईन पद्धतीने धान्य देण्याची मुभा आहे; पण आॅफलाईन धान्य वाटप केल्यानंतर दुकानदारांना याचा मोबदला मिळत नाही. यामुळे जवळचा पैसा गुंतवून पदरी उपेक्षा येताना दिसते. पॉस मशीनमध्ये अद्याप असंख्य कार्डधारकांचा आर.सी. नंबर नाही. कार्डच्या प्रतवारीत बदल झाला. त्याचा फटका वितरकाला बसतो. लाभार्थ्यांच्या कार्डावरील नंबर, कुटुंबातील सदस्य संख्या आणि एपीएल, बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य गट यात गोंधळ असल्याने हिशेब जुळत नाही.
खरे गरजवंत वंचितच
फेब्रुवारी २०१८ या चालू महिन्यात प्रथमच आॅफलाईनचा नमुना स्वस्त धान्य दुकानात देऊन त्यावर वितरण करा, असा स्पष्ट आदेश पुरवठा विभागाने दिला. त्याची अंमलबजावणीही केली. असे असताना दुकानदारांना आॅफलाईनचे बील देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शासन शिक्षक तथा मोठ्या वेतनावर नोकरी करणाऱ्या वर्गालाही एपीएलमधून धान्य देत आहे तर अपंग, मजुरी करणारे, रिक्षावाले, भिक्षेकरी हा वर्ग मात्र वंचित आहे. त्यांचाही तगादा धान्य दुकानदारांना सोसावा लागत आहे. यामुळे सर्व सुविधायुक्त आॅनलाईन पद्धत सुरू करणे तथा त्याचा योग्य मोबदला दुकानदारांना देणे गरजेचे आहे.

Web Title: Shop online; But shopkeeper on the saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.