कापूस खाली करण्याची मजुरी खरेदीदारांनी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:20 AM2017-11-09T00:20:15+5:302017-11-09T00:20:26+5:30
कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते. ही मजुरी नियमानुसार व्यापाºयांनी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी स्वीकारले.
पणन महामंडळाचे संचालक यांनी ३१ मार्च २०१० ला राज्यातील बाजार समित्यांकरीता आदर्श उपविधी तयार केली. ती सर्व बाजार समित्यांनी स्वीकृत केली. या नवीन आदर्श उपविधी राज्यातील सर्वच बाजार समित्यांनी स्वीकृत केल्या आहे. स्वीकृत केलेल्या नवीन आदर्श उपविधीत १ ते ६० मधील अनुक्रमांक २८(अ) मध्ये शेतमाल वजनावर लावण्यापासूनचे दर हे खरेदीदाराने द्यावयाचे आहेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परंतु संपूर्ण राज्यात कापूस या शेतमालाचे परिमान हे वजनावर असून वजनासाठी लावल्यावर वाहनातील कापूस खाली करण्याची मजूरी ही शेतकºयांकडून वसूल केल्या जात आहे. हिंगणघाट बाजार समितीने शेतकरी हिताचा विचार करून कापूस गाडी खाली करण्याचा नियमबाह्य खचार्तून शेतकºयांची त्वरित मुक्तता करावी. उपविधीतील २८(अ) च्या तरतूदीनुसार वजनावर लावल्यानंतर कापूस गाडी खाली करण्याची मजुरी ही खरेदीदारांनी द्यावी असे निर्देशित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राज्यात हिंगणघाट बाजार समितीत शेतकरी हिताच्या योजना राबविण्यात येतात असा लौकिक आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रा.मधुकर झोटींग, मधुसूदन हरणे, बाबा दिवानजी, दिलीप लाखेकर, मनोज पुसदेकर, सुधाकर अगडे, अजाब राऊत, वाघमारे आदींनी केली.
मजुरीदाखल साडेतीन कोटींची लूट
हिंगणघाट बाजार समिती आवारात कापसाची आवक मागील दोन हंगामात ३५ लक्ष क्विंटल आहे. यानुसार कापूस खाली करण्याचा मजूरी दर १० रुपये क्विंटल याप्रमाणे ३ कोटी ५० लक्ष रुपये शेतकºयांकडून नियमबाह्यरित्या वसूल करण्यात आले, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. शेतकºयांची नियमबाह्य खचार्तून मुक्तता करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.