दुकानातील साहित्य रस्त्यावर

By admin | Published: April 9, 2017 12:24 AM2017-04-09T00:24:31+5:302017-04-09T00:24:31+5:30

येथील गजबजलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. रस्त्यालगतच्या

Shops on the street | दुकानातील साहित्य रस्त्यावर

दुकानातील साहित्य रस्त्यावर

Next

वाहतुकीला अडथळा : रस्त्यावर वाहन थांबवून प्रवाशांची ने-आण
सेलू : येथील गजबजलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. रस्त्यालगतच्या दुकानदारांनी रस्त्याच्या काठापर्यंत दुकाने थाटली आहे. यात काही दुकानदार दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. तर वाहन चालकही भर रस्त्यात वाहन उभे ठेवून प्रवासी ने-आण करतात. त्यामुळे वाहतुकीचा पचका झाला असून ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे.
भाजी मार्केटचा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर देखील हाच प्रकार पाहायला मिळतो. यात दुकानासमोर ग्राहकांचे वाहन ठेवले जाते. त्यात भरीसभर म्हणून आॅटो व चारचाकी वाहने रस्त्यालगत थांबविले जातात. त्यामुळे या रस्त्याने आवागमन करायला जागा शिल्लक नसते. येथील मेडिकल चौक तर अपघात प्रवण स्थळ बनले आहे. येथे कुणीही आपल्या मर्जीने दुकान थाटून साहित्य रस्त्यावर मांडताना दिसतो. पोलिसांच्या निवास स्थानासमोर देखील फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांनी दुकान मांडले आहे. या विक्रेत्यांना प्रशासनाकडून जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे ठरत आहे.
यापुर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार संजय बोठे यांच्यासमोर उपस्थित सदस्यांनी ही बाब गांभिर्याने मांडली. यावर ठाणेदारांनी आठ दिवसात कारवाई करतो असे सांगितले होते. मात्र अजूनही येथील अतिक्रमण कायम आहे. याच मार्गावरुन बसस्थानकावर बसगाड्या जातात. त्यामुळे बसचालक व अन्यवाहन चालकांना कमालीचा त्रास होतो. यातही काही रस्ते नगरपंचायतीच्या तर काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र अतिक्रमणाविषयी कडक भूमिका घेण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारत पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

बसस्थानक परिसरात होते वाहतुकीची कोंडी
बसस्थानक चौकात रस्त्यापर्यंत दुकाने थाटुन अतिक्रमण करण्यात आले आहे. बसस्थानकाच्या समोरुन वडगाव कडे जाणारा रस्ता आहे. या टी पाँईटवर वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.
सेलू शहरातील सर्वच मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असताना नगरपंचायत प्रशासन मात्र याविरोधात कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर अतिक्रमण करुनही काही दुकानदारांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर आणून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे.

 

Web Title: Shops on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.