अल्पावधीतच पुलाला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:53 PM2018-03-29T23:53:28+5:302018-03-29T23:53:28+5:30

सोनेगाव (बाई) मार्गावरील भदाडी नाल्यावर काही महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधीत पुलाला भेगा पडल्या आहे.

In the short run, | अल्पावधीतच पुलाला तडे

अल्पावधीतच पुलाला तडे

Next
ठळक मुद्देअपघाताचा धोका : आतापर्यंत चार वेळा केली डागडुजी

ऑनलाईन लोकमत
वायगाव (नि.) : सोनेगाव (बाई) मार्गावरील भदाडी नाल्यावर काही महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधीत पुलाला भेगा पडल्या आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे.
येथे अपघात होण्याची शक्यता आहे. आजवर या पुलाचे बांधकाम चारवेळा करण्यात आले. मात्र पुराच्या प्रवाहाने येथील पूल वाहुन गेला. येथील पुलाचे बांधकाम करावे म्हणून लोकमतने सतत पाठपुरावा केला. याची प्रशासनाने दखल घेत नव्याने पुलाचे बांधकाम करण्याचे सांगितले. पुलाच्या बांधकामाची अंदाजे किंमत ६० लाख रुपये आहे. मात्र अल्पावधीत पुलाला तडे गेल्याने काम निकृष्ट दर्जाचे केल्याची ओरड ग्रामस्थ करतात.
येथील पुलाच्या बाजुला बांधकामातील लोखंडी सळाख्या पडून आहे. याचा वापर झालेला नाही. चार महिन्यात पुलाला मोठे तडे गेले आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी आहे. हा पूल अनेक गावांना जोडतो. देवळीकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सरुळ, चणा (टाकळी), सोनेगाव (बाई), चिंचाळा या गावांना याच पुलावरुन आवागमन करावे लागते. असे असताना संबंधित अधिकारी याची चौकशी का करीत नाही असा प्रश्न ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पडला आहे. या पुलाचे बांधकाम अनिल भुत यांच्या देखरेखीत केले. त्यांना बांधकामाबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. कंत्राटदाराने बांधकाम करताना निकृष्ट साहित्य वापरले काय याची चौकशी करण्याची मागणी वरिष्ठ अभियंता यांच्याकडे केली.
चौकशीची मागणी
या पुलाचे बांधकाम आतापर्यंत चारवेळा केले. मात्र यानंतर भेगा पडत असल्याने या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कामे व्यवस्थितच राहते. हे कामही व्यवस्थित झाली आहे. मी स्वत: पाहणी केली आहे.
- एम.आर. सोनवणे
डेप्युटी इंजिनिअर, सार्वजनिक बांधकाम, देवळी.

Web Title: In the short run,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.