आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:41 PM2018-08-23T21:41:56+5:302018-08-23T21:42:39+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे दहा गावांसाठी दिलासा देणारे ठरणारे असून आवश्यक औषधांचा साठा येथे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मांडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे दहा गावांसाठी दिलासा देणारे ठरणारे असून आवश्यक औषधांचा साठा येथे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
सध्या बदलत्या वातावरणामुळे किटकजन्य डेंग्यू, मलेरिया आदी आजार डोके वर काढू पाहत आहेत. परिसरात ताप, सर्दी, खोकला आदी आजारांची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालये रुग्णांनी गजबजली आहेत. अशातच औषधांचा तुटवडा या आरोग्य केंद्रात निर्माण झाल्याने रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेडगाव, सुजातपूर, मनगाव, चिचोली, किनगाव, बोथुडा, देरडा, सावंगी आदी गावांमधील नागरिक आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे; पण काही औषधी रुग्णालयात मिळतच नसल्याने अधिकचा आर्थिक फटकाच रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे.
काही औषधींचा साठा आरोग्य केंद्रात कमी आहे. त्याची चौकशी वरिष्ठ अधिकाºयांनी केली असून येत्या आठ दिवसात औषधसाठा दिल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. वेळीच औषधसाठा उपलब्ध होईल.
- डॉ. एच. इ. सोनकुसरे, वैद्यकीय अधिकारी, मांडगाव.