आरोग्याची पालखी घेतलीय खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:12 PM2019-07-11T22:12:21+5:302019-07-11T22:12:50+5:30
शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि.............
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि विद्यार्थी शिक्षणापासून मागे राहू नये म्हणून स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याची पालखी खांद्यावर घेतली आहे, असे प्रतिपादन स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी केले.
स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या १०० नेत्ररोग तपासणी मोहिमेत बोथली किन्हाळा पंचायत समिती सर्कलअंतर्गत येणाºया पिंपळखुटा, गुमगाव, बोथली (किन्हाळा), तळेगाव (रघुजी), भादोड या पाच गावांत एकाच दिवशी आणि एकाचवेळी सुरू झालेल्या नेत्र रोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आर्वी, आष्टी, कारंजा या तीन गावातील शेकडो गावात हे शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील जवळपास १० हजात हजार लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली. ६ हजार लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. १ हजार लोकांना मोतिबिंदू निघाले आहेत. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंपळखुटा येथे गौरव वाघ, शंकर राठी, पिंपळखुटाचे सरपंच चरडे, राजाभाऊ पावडे, अवथळे, पुष्पराज कलोकार, नथ्थुजी पुराम, मधुकर चौकोने, राजू राठी, ट्रस्ट समन्वयक मंगेश चांदूरकर, सागर निर्मळ, सुनील इंगळे, दिवाकर भेदरकर, मिलिंद गोहत्रे तसेच ट्रस्टच्या शिक्षिका आदींनी सहकार्य केले.