भाजप श्रेष्ठीकडून कार्यकर्त्याला कारणे दाखवा

By admin | Published: September 4, 2015 02:03 AM2015-09-04T02:03:39+5:302015-09-04T02:03:39+5:30

तालुक्यातील भाजपप्रणित तळेगाव ग्रामपंचायतील भ्रष्टाचाराची तक्रार थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत ...

Show the reasons for the BJP workers correct the worker | भाजप श्रेष्ठीकडून कार्यकर्त्याला कारणे दाखवा

भाजप श्रेष्ठीकडून कार्यकर्त्याला कारणे दाखवा

Next

तळेगाव(टा.) ग्रा.पं.भ्रष्टाचार प्रकरण : पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका
वर्धा : तालुक्यातील भाजपप्रणित तळेगाव ग्रामपंचायतील भ्रष्टाचाराची तक्रार थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत गावातील भाजप कार्यकर्ता प्रशांत वंजारी याला पक्षश्रेष्ठीने कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वात परिसरातील काही सरपंचांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांच्याकडे बुधवारी धाव घेऊन तळेगाव(टा.) येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची तक्रार सर्वप्रथम पक्षशिस्त म्हणून पक्षश्रेष्ठींकडे देणे आवश्यक होते. यानंतर संबंधितांवर काय कार्यवाही करायची याबाबत पक्षश्रेष्ठींनी दिशानिर्देश दिले असते.
असे असताना प्रशांत वंजारी यांनी तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीवर भाजपप्रणित आघाडीची सत्ता असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हातमिळवणी करून थेट मुख्य कार्यकाही अधिकारी यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिल्यामुळे पक्षशिस्तीचा भंग झाल्याची बाब डॉ. गोडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिष्टमंडळाची भूमिका योग्य असल्याचे गृहीत धरुन डॉ. गोडे यांनी कार्यकर्ता प्रशांत वंजारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या बाबीला जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत गाजत असलेला घोळ आता पक्षातही गाजत आहे.

Web Title: Show the reasons for the BJP workers correct the worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.