कंचनपूर येथे पाण्यासाठी माजी सैनिकांसह चिमुकल्यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:10 AM2018-05-21T00:10:09+5:302018-05-21T00:10:09+5:30
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी या येथे माजी सैनिकांनी श्रमदान केले. आदिवासी बहुल असलेल्या या गावांत जलसंवर्धनाची कामे जोरात सुरू आहे. भारत माता की जय, जय जवान, जय किसानचा जयघोष करून येथे श्रमदानाला प्रारंभ होतो.
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटनेचे सचिव श्यामभाऊ परसोडिकर यांनी गावाच्या आणखी काही भागाची पाहणी केली. प्रहार संघटनेचे पुलगाव देवळी विधानसभा प्रमुख राजेश सावरकर यांना गावाजवळील नाला रूंदीकरणासाठी पाच दिवस पोकलँड जर मिळाला तर रसुलाबादही पाणीदार होईल, असे म्हटले असता त्यांनी दोन दिवस पाणी द्यायला कबुल केले.
कंचनपूर येथे श्रमदानाला माजी कर्नल चित्तरंजन चौडे, अरुण हस्ती, विजय भुते, विवेक ठाकरे, प्रहार संघटना माजी सैनिक सेल अध्यक्ष, सलुते, भानुदास सोमनाथ, बिपिन मोघे, चिमुकल्यांपैकी समीक्षा, कुणाल, भूमिका, दर्शन सावरकर, अंशु व टीना अजमिरे, माजी पं.स. सदस्य तुळशीदस भबुतकर, पं.स. सदस्य अरुणा रा. सावरकर, सरपंच राजश्री धारगवे, ग्रामसेवक अशोक बोबडे, किशोर सावरकर, प्रिती सावरकर, नितीन धाडसे, प्रफुल अनवाने, राजूभाऊ मानकर, डॉ. लोकेंद्र दाभिरे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना उईके, ज्ञानेश्वर मानकर, भास्कर देऊळकर, प्रकाश सातभाई, राहुल सावरकर, पिंटू काळपांडे, संतोष लाडे, नसीम सौदागर, घनश्याम क्षीरसागर, मंगेश चौधरी, मंगेश काटोले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला.
खैरी येथील संपूर्ण गाव जाते श्रमदानाला
विरुळ (आकाजी) - येथून जवळच असलेल्या व निसर्गाच्या कुशीत लपलेल्या खैरी या गावाने वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यामुळे गावकरी रोज पहाटे चार वाजता उठून श्रमदान करतात. शंभर टक्के आदीवासी बहुल असलेल्या या गावकऱ्यांना श्रमदानासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून आज वर्धा येथील फिनिक्स अकँडमीच्या विद्यार्थांनी गावात येवून गावकºयांसोबत श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढविला.