जिल्हाधिकाऱ्यांचे नांदोरा येथे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:43 PM2018-05-10T23:43:23+5:302018-05-10T23:43:23+5:30
कारंजा तालुक्यातील नांदोरा आणि लिंगा (मांडवी) या गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानाला सुरूवात केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गावाच्या वन तलावाची पाहणी करून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा तालुक्यातील नांदोरा आणि लिंगा (मांडवी) या गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानाला सुरूवात केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गावाच्या वन तलावाची पाहणी करून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.
वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत अधिकाधिक पाणी साठविण्यासाठी श्रमदान करण्याची चुरस निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांसोबतच प्रशासन व सामाजिक संस्थांचा सहभाग वाढत आहे. यात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नांदोरा आणि लिंगा (मांडवी) या गावांत श्रमदान करून ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.
शिवाय या दोन्ही गावांमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे वाढावित. जेणेकरून ग्रामस्थांना मोबदलाही मिळेल, अशा सूचना त्यांनी कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर यांना दिल्यात.
पिपरी येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पाच हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या या तलावातून ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. हा तलाव जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे. ८ ते १० दिवसांत गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यात. तलावातून निघालेला गाळ शेतकºयांनी घेऊन जावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारंजाचे तहसीलदार कुमावत, वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर, ग्रामस्थ उपस्थित होते.