श्रावणबाळ, संजय गांधीचे निराधार अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:08 PM2017-09-11T23:08:51+5:302017-09-11T23:09:09+5:30

शासनाकडून निराधार वृद्धांकरिता श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येते.

Shravanabal, deprived of Sanjay Gandhi's gross funding | श्रावणबाळ, संजय गांधीचे निराधार अनुदानापासून वंचित

श्रावणबाळ, संजय गांधीचे निराधार अनुदानापासून वंचित

Next
ठळक मुद्देरिपाइं (आ.) चा जिल्हाकचेरीवर मोर्चा : रक्कम देण्यास विलंब झाल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाकडून निराधार वृद्धांकरिता श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येते. वर्धेत या अनुदानाचे वितरण झाले नसल्याने लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या लबाडपणामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी रिपब्लिकन पार्टी आंफ इंडिया (आ.) चे जिल्हा अध्यक्ष व जि.प.सदस्य विजय आगलावे यांच्या नेतृत्त्वात मोर्चा नेण्यात आला.
यावेळी त्वरीत अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. या चर्चेत श्रावणबाळ, संजय गांधी योजनेचे नागरिकांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. त्या अगोदर नियमित मिळत होते. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या शासन स्तरीय लाभाच्या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. दसरा, दिवाळी सारखे सण काही दिवसांवर आले आहे. अनुदानाबाबत वर्धेचे तहसीलदार, नायब तहसीलदाराकडून दिशाभुल केल्या जात आहे. गरीबांची फसगत करून पैसे लुबाडण्याचा भयंकर प्रकार येथे सुरू आहे. सध्या खर्च करा व अनुदान मिळवा हा फसवेगिरीचा प्रकार येथे जोरात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी मदतीपासून वंचित असल्याचा विजय आगलावे यांनी जिल्हाधिकाºयांसमक्ष केला.
निवेदन देताना महेंद्र मुनेश्वर, बशिर शेख, सुरेश नगराळे, मारोती तेलकर, माला ठोंबरे, सुषमा गजभिये, मंदा फुलझेले, मनीषा चौधरी, आशा तांदुळकर, अनिता मडकाम, बेबी होले, नलु ढोके, सायरा बानु, शबाना परविन, अमोल धोटे यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Shravanabal, deprived of Sanjay Gandhi's gross funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.