श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात रंगला नामसंकीर्तन सोहळा

By Admin | Published: December 28, 2016 12:50 AM2016-12-28T00:50:06+5:302016-12-28T00:50:06+5:30

बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला.

Shree Vitthal Rakhmini Devasthan will be celebrated in a colorful ceremony | श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात रंगला नामसंकीर्तन सोहळा

श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात रंगला नामसंकीर्तन सोहळा

googlenewsNext

सेवाग्राम : बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला. यात विविध धार्मिक कार्यक्रमासह भजन, देवजागर, कीर्तन, भारूड व पालखी सोहळा असे कार्यक्रम झाले.
शुक्रवारी माया रोकडे तांच्या हस्ते कलशस्थापना करुन उत्सवाचा प्रारंभ केला. यानंतर एकादशीला मुर्तीची महापूजा अतुल तुपकर यांच्या हस्ते करण्यात आली. यासह काकडा, भजन, सकाळी व रात्री आरती, हरिपाठ तसेच राष्ट्रीय कीर्तनकार भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम झाला. शनिवारी सामुदायिक कीर्तन झाले. प्रशांत महाराज चलाख यांनी मार्गदर्शन केले. तसेच रविवारी राहूल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.
यानंतर परिसरातून पालखीसह दिंडी काढण्यात आली. यात भजनी मंडळीच्या साथीने नागरिक सहभागी झाले होते. भजन मंडळी, करंजी (भोगे), भजन मंडळी सोहमनगर, भजन मंडळ पहेलानपूर व खापरी (ढोणे), यासह बापुनगर, टेलीकॉमनगर, डॉक्टर कॉलनी, म्हाडा कॉलनी, वरूड रेल्वे जूनी वस्ती येथील भजनी मंडळी सहभागी झाली होती. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे भाविकांनी आरती ओवाळून स्वागत केले. महिला भगिनींनी घरासमोर रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता.
पालखी सोहळ्यानंतर दहिहांडी कार्यक्रम राहुल महाराज हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरणात पाहायला मिळाले. गावकरी व महिलांचा यात सहभाग होता. दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)


श्रीमद भागवत कथा सप्ताहात प्रवचन
सेवाग्राम : जुन्या वस्तीतील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे अखंड ज्ञानयज्ञ संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे. यात कथा प्रवचन आयोजित करण्यात आले. भाविकांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन केले. आरती झाल्यानंतर रात्रीला हवन व पुजन झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.
कथा प्रवक्ता केशवस्वामी सारंग चैत्यन्य महाराज, (अमरावती) आहे. भारतीय संस्कृती व परंपराचे ज्ञान शिक्षणासोबत गुरूकुलात विद्यार्थ्यांना दिले जात असे. आजही अशाच शिक्षणासाठी विद्यार्थी माधुकरी मागून आपले शिक्षण पूर्ण करतात. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह असे म्हणतो. ज्यात माधुर्य आहे आणि देणारा किंवा देणारी सहृदयी आहे. त्याचा लाभ दोघांनाही होतो. त्या भोजनाच गोडवा काही औरच असतो. भगवंतासाठी गरीब सुध्दा पोहे नेतो. भगवंत ते आवडीने खातात. यातून मैत्री आपल्याला दिसून येते. खऱ्या मैत्रीभावात गरीब श्रीमंत अशी भावना नसते. भारतात वर्णव्यवस्था होती. पण आपण समदृष्टीच्या भावनेने सर्वांशी जुळलो आहे. धर्म, संस्कृतीचे विस्मरणाने नैतिकतेचे पतन आहे. त्यामुळे मन सुन्न करणाऱ्या घटना समाजात होताना दिसतात. भगवंताला शरण जात मर्यादेत जीवन जगावे.

Web Title: Shree Vitthal Rakhmini Devasthan will be celebrated in a colorful ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.