शुभांगी उईके बलात्कार व खून प्रकरणात पोलिसांनी केले पुरावे नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:25 PM2018-03-31T23:25:11+5:302018-03-31T23:25:11+5:30
येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे.
पोलिसांनीच परिस्थितीजन्य पुरावे नष्ट केल्याने तपासातील अधिकारी व पोलीस यांना वाचविण्यासाठी आत्महत्येचे स्वरुप देत तपासाची दिशाच बदलविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस विभाग प्रथम दर्शनी बलात्कार व खुनच असल्याचे दिसणाऱ्या या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरुप देत आहे. पकडलेल्या आरोपीचे मेडीकल सुध्दा केल्या गेले नाही. अश्या गंभीर गुन्ह्यात पोस्टमार्टम रिपोर्टला उशिर करणे तसेच ज्या रेल्वेसमोर शुभांगीने आत्महत्या केली त्याचे बयान नोंदविण्यात आले नाही.
शुभांगीचा मृतदेह नग्न अवस्थेत होता. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता, तिचे सर्व कपडे रेल्वेच्या वेगाने निघुन गेले असावेत असा दावा पोलिसांचा आहे. त्या दिवशी तिने जिंस पैंट व जर्सी घातली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी शुभांगीच्या मृतदेहा सोबतच तिचे फाटलेले, रक्तानी माखलेले कपडे गुन्ह्याच्या तपासासाठी जप्त न करता तिच्या मृतदेहा सोबतच पोस्टमार्टम करीता दवाखान्यात पाठवीले व पोस्टमार्टम झालेल्या शुभांगीच्या मृतदेहा सोबतच ते कपडे तिच्या घरी पाठविल्या गेलेत. ते तिच्या ृमृतदेहासोबत जाळल्या गेलेत.
शुभांगीच्या शरीराचे कमरे पासुन दोन तुकडे झालेत. त्या दिवशी तिने जिंस पैंट व जर्सी घातली होती असे पोलीस तपासात म्हटले, परंतु ज्या रेल्वेने तिच्या देहाचे तुकडे झालेत त्या गाडीचा वेग असा किती होता की तिच्या अंगावरचे सर्वच वस्त्र निघुन गेलेत. पोलीस तपासत जे फोटो आहेत त्या मध्ये मृत शुभांगीच्या हाती पांढरी ओढनी दिसत आहे. ती दुरुन उडत आली व तिच्या हातावर पडली असे पोलिसांचे म्हणणे आहे. या ओढनीवर रक्ताचे कुठलेही डाग नाही. यामुळे सर्व कपडे गेले तर ओढणी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.