कालव्याच्या पाण्याचा शेतातील सोयाबीनच्या ढिगाला वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:30 PM2017-10-30T22:30:29+5:302017-10-30T22:30:45+5:30
निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतात शिरले. ते शेतात लावलेल्या सोयाबीन पिकाच्या गंजी सभोवताल साचले असून पीक खराब होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतात शिरले. ते शेतात लावलेल्या सोयाबीन पिकाच्या गंजी सभोवताल साचले असून पीक खराब होत आहे. यात शेतकºयाचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रकार कोळोणा (चोरे) येथे घडला आहे. या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर (सिंगारवाडी) येथील शेतकरी राजेश्वर दामोधर पवार (३४) यांची कोळोणा (चोरे) मौजात ५ एकर ओलिताची शेती आहे. त्या शेतात त्यांनी सोयाबीनचे पीक घेतले आहे. त्यांच्या शेताजवळून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. लगतच शेतकºयांच्या शेतांना पाणी देण्यासाठी लघुकालवा तयार केला आहे. या लहान कालव्याच्या ओव्हरफ्लोचे अतिरिक्त पाणी शेतकºयांच्या शेतात शिरले. कसेबसे हाती आलेल्या सोयाबीनची सवंगणी करून त्याचा ढीग मळणी करण्याकरिता शेतातच ठेवला होता. चार दिवसांपूर्वी शेतकरी शेतात गेला असता त्यांना शेत कालव्याच्या पाण्याने तुडूंब भरलेले दिसले. अख्खा सोयाबीनचा ढीग पाण्यात होता. यामुळे शेतकºयाला धक्का बसला. अधिकाºयांना फोन करून तथा त्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत तक्रारी केल्या; पण तीन दिवसांपासून अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन शेतात भिजत असून दोन-तीन दिवसांतच अंकुरित झाले. आतापर्यंत अस्मानी संकटाने सोयाबीनचे नुकसान केले. यामुळे बाजारपेठेत भाव नाही. आता या सुलतानी संकटाची भर पडली आहे. वारंवार तक्रारी केल्या तथा चकरा मारल्यानंतर शुक्रवारी अधिकारी पाहणी करण्यास आले. पाहणी केल्यानंतर लघु कालव्याच्या ओव्हर फ्लोचे पाणी बाहेर शिरत होते. यावर हे काम आम्ही केले नाही, यापूर्वीच्या अधिकाºयांनी चुकीचे काम केले, असे सांगून त्यांनी काढता पाय घेतला.
शेतकºयाने नुकसान भरपाईची मागणी केली; पण अधिकारी दाद देत नव्हते. अखेर भरपाईच्या मागणीकरिता शेतकºयाने अधिकाºयाच्या गाडीखाली झोपून गाडी रोखून धरली. यानंतर पोलिसांना बोलविण्यात आल्याने कालव्याचे काम करीत भरपाई देण्याचे आश्वासन देत अधिकारी निघून गेले; पण पंचनाम्याच्या हालचालीला वेग आला नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.