सिग्नल एक दिवास्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:50 PM2018-03-10T23:50:36+5:302018-03-10T23:50:36+5:30

वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले.

Signal a daymoon | सिग्नल एक दिवास्वप्नच

सिग्नल एक दिवास्वप्नच

Next
ठळक मुद्देसहा महिन्यांपासून चौकात केवळ खांबच : वाहतूक सुरळीत होण्याऐवजी अडथळेच

ऑनलाईन लोकमत
वर्धा : वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले. नवे अद्यावत वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याचे काम झाले. रस्त्याच्या मधोमध खांब उभे करून दिवे लावण्याला सहा महिन्याचा कालावधी झाला; पण ते अद्यापही सुरू झाले नाही. यामुळे सिग्नल वर्धेकरांकरिता सध्यातरी दिवास्वप्नच ठरत असल्याचे दिसत आहे.
आर्वी नाका व शिवाजी चौक येथे रस्त्याच्या मधोमध खांब उभे करून दिवे उभे करण्यात आले. रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या या खांबांना सुरक्षेकरिता कुठलीही सुविधा नसल्याने येथे वाहने आदळल्याच्या घटना घडल्या आहे. या घटना किरकोळ असल्याने मोठा अनर्थ टळला. याकडे दुर्लक्ष झाल्यास यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होणारी मोठी घटना टाळण्याकरिता संबंधीत विभागाने याकडे लक्ष देत पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुन्हा वाहतूक नियंत्रक दिवे बेपत्ता होण्याची शक्यता
वर्धेत यापुर्वी शिवाजी चौक, बजाज चौक, आर्वी नाका, इंदिरा गांधी चौक आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले होते. या दिव्यांना लवकरच घरघर लागल्याने ते काही काळातच बेपत्ता झाले. अनेक ठिकाणी या दिव्यांच्या खांबांना पाल बांधून काही जणांनी भाजीविक्री, चांभाराचे दुकान थाटले होते. तर शिवाजी चौक परिसरात खांबावर वाहने धडकल्याने त्यांनी आपली जागा सोडली होती. आताही उभ्या असलेल्या नव्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबाची हिच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लावलेले दिवे लवकर सुरू करून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देणे गरजेचे झाले आहे. आर्वी नाका व बजाज चौक या दोन मोठ्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे अत्यंत गरजेचे झाले आहे. या चौकात पोलिसांना उभे राहण्याकरिताही जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच होत आहे.

आर्वी नाका परिसरात या सिंग्रच्या समोरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ते कमेरे सध्या स्थितीत सुरू आहे. मात्र या कॅमेºयाचे वायर खुले असल्याने येत्या काळात ते बंद पडण्याची शक्यता नाकारात येत नाही. शहरातील मोठा आणि पाच रस्त्यांचा एकमेव चौक असलेल्या या भागात वाहतूक नियंत्रकण दिवे असणे गरजेचे झाले आहे. शिवाय रस्त्याच्या मध्यभागी असलेले ड्रमही बेपत्ता होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: Signal a daymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.