ज्येष्ठांची मूक चिंतनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:20 PM2017-11-11T22:20:39+5:302017-11-11T22:21:20+5:30
जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी हक्काच्या मागण्यांसाठी सेवाग्राम ते वर्धा मूक चिंतनयात्रा काढली. या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी हक्काच्या मागण्यांसाठी सेवाग्राम ते वर्धा मूक चिंतनयात्रा काढली. या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महात्मा गांधी आश्रमसमोर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीने ११ आॅक्टोबरपासून बैठा बेमुदत सत्याग्रह सुरू केला आहे. सत्याग्रहाला १० नोव्हेंबर रोजी एक महिन्याचा कालावधी झाला; पण शासनाला अद्याप दखल घ्यावीशी वाटली नाही. सेवानिवृत्तांची आर्थिक हक्काची मागणी शासनाकडे प्रलंबित असून वेतनाविना निवृत्तांना जगणे असह्य झाले आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले आहे. पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून समोर असल्याने बैठा सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रह स्थळी शेख हाशम, ठोसर, संदीप भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर विविध मागण्यांचे फलक घेत स्त्री, पुरुष, मुली, मुले मूक चिंतनयोत्रेत सहभागी झाले. म. गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर मुलींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले. याप्रसंगी निधी भांडेकर, स्वानंदी वागळ, ऐश्वर्या राहाटे, वैरागडे, कुत्तरमारे यांनी चर्चा केली.
बँकेची मालमत्ता ताब्यात घेत कर्मचाºयांची देणी द्यावी
राज्यातील जिल्हा भूविकास बँक व शिखर बँकेच्या मालकीची मोक्याच्या ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची रेडी रेकनर व्हॅल्यू ५५० कोटी तर बाजार किंमत २ हजार कोटींवर आहे. ती मालमत्ता ताब्यात घेत कर्मचाºयांची ३०० कोटींची देणी त्वरित देण्यात यावी. यातूनच ज्येष्ठांच्या मागण्यांचा प्रश्न सुटू शकतो, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
यात्रेत सुरेश रहाटे, सचिन काळे, अशोक वैरागडे, मधुकर सोरते, सागर कुत्तरमारे, हरिदास वानखेडे, अशोक मगर, देवीदास राखुंडे, रत्नाकर गुजर, लक्ष्मण खडसे, पुष्पा मानकीकर, सत्यवती शेर, धनश्री भांडेकर, शोभा खडसे, नेहा कुत्तरमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भातील सेवानिवृत्त सहभागी झाले होते.