अधिकाऱ्याच्या टेबलवर बसून ठिय्या

By admin | Published: September 20, 2016 01:25 AM2016-09-20T01:25:55+5:302016-09-20T01:25:55+5:30

जल प्राधिकरण कार्यालयातर्फे पाणीपुरवठा केला जातो; पण निश्चित वेळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.

Sit down on the executive table | अधिकाऱ्याच्या टेबलवर बसून ठिय्या

अधिकाऱ्याच्या टेबलवर बसून ठिय्या

Next

भाजयुमोचे आंदोलन : पाणी पुरवठ्यातील अनियमिततेविरूद्ध जल प्राधिकरण कार्यालयात आंदोलन
आर्वी : जल प्राधिकरण कार्यालयातर्फे पाणीपुरवठा केला जातो; पण निश्चित वेळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. याबाबत अनेकांनी संबंधित कार्यालयात विचारणा केली; पण कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून भाजयुमोद्वारे जीवन प्राधिकरण कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या टेबलचाच ताबा घेतला होता. रस्ते बांधकामाप्रसंगी पाईपलाईन टाका, फुटलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त करा आदी मागण्या केल्या. यावर दोन दिवसांत कार्यवाहीची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
जल प्राधिकरण कार्यालयामार्फत संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो; पण पाणी पुरवठा करण्याची निश्चित वेळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. कधी पाणी पुरवठा एकदम पहाटे, कधी रात्री तर कधी दुपारी पाणीपुरवठा केला जातो. निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना ताटकळावे लागते. शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यामुळे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर संबंधित कार्यालयाद्वारे रस्ता फोडून पाईपलाईन टाकली जाते. शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. यामुळे पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होत आहे. फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरूस्त करा अशी मागणीही भाजयुमोद्वारे करण्यात आली. या मागण्यांकरिता भाजयुमो जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी जल प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कार्यालयामार्फत ठोस व लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली. उपविभागीय अभियंता उमाडे व शाखा अभियंता खासबागे हे कार्यालयात हजर नव्हते. यामुळे कर्मचारी बोढाले यांनी दोन्ही अभियंत्यांना संपूर्ण प्रकाराची भ्रमणध्वनीवर माहिती दिली. यानंतर बाळा जगताप यांनी उमाडे व खासबागे यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. चर्चेनंतर दोन दिवसांत निश्चित वेळेत शहराला पाणी पुरवठा केला जाईल. पाईप आल्याबरोबर फुटलेल्या पाईपलाईन दुरूस्त केल्या जातील. रस्त्यांचे बांधकाम सुरू असताना पाईपलाईन टाकण्याचे काम करावे लागते; पण पाईपची कमतरता असल्याने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पाईप उपलब्ध होताच पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दोन्ही अभियंत्यांनी दिली. शिवाय तत्सम पत्रही कार्यालयामार्फत जगताप यांना देण्यात आले. यावरून आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले; पण मुदतीत कामे पूर्ण झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने देण्यात आला.(तालुका/शहर प्रतिनिधी)

कार्यकारी अभियंत्यांना दिली बेशरमची झाडे भेट; रिपाइंचे आंदोलन
४वर्धा : शहराला येऊन मिळणाऱ्या प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजविता येत नसतील तर शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमानुसार खड्ड्यांत बेशरमची झाडे लावावी, अशी मागणी रिपाइंने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोमवारी बेशरमची झाडे भेट करीत आंदोलन करण्यात आले.
४वर्धा-नागपूर, वर्धा-सेवाग्राम, बजाज चौकालगतचा आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, वर्धा ते बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), नगर पालिकेसमोरील रस्ता असे सर्वच प्रमुख रस्ते उखडले आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडून रस्त्यावर आली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्यांनी ये-जा करणे कठीण झाले आहे. शासनाचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे. रस्त्यांवर खड्डे तयार आहे. सध्या पावसाळाही सुरू असल्याने खड्डे खोदण्याची व पाणी टाकण्याची गरज नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांमध्येच बेशरमची झाडे लावावी, अशी मागणी करीत रिपाइंच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना बेशरमची झाडे भेट दिली.
४आंदोलनात रिपाइं जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांच्या नेतृत्वात अजय मेहरा, देविदास भगत, महेंद्र मुनेश्वर, दिलीप सुखदेवे, अशोक चैनानी, अ‍ॅड. राजेश थूल, गौतम डंभारे, धर्मपाल शंभरकर, विजय नगराळे, सतीश इंगळे, सुरेंद्र पुनवटकर, देवानंद तेलतुंबडे, विजय चन्ने, विलास मून, महादेव तागडे, मोहन वनकर, देवानंद कांबळे, संजय वर्मा, रवी विजयकर, प्रदीप मेंढे, अमोल दाभणे, प्रवीण ताकसांडे, प्रशांत विघ्ने, शुद्धोधन नाखले, बाबा बडगे, संजय गवई, शुभम पाणबुडे, संजय जवादे, आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)

स्वच्छता दिन पाळावा
४वर्धा - संत गाडगेबाबा यांचा २३ फेबु्रवारी हा जन्मदिवस आहे. तो स्वच्छता दिन म्हणून राज्य सरकारने घोषित करावा. जयंती, स्मृतिदिन शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा. जयंती, पुण्यतिथींच्या सरकारच्या शासकीय यादीत गाडगेबाबांच्या जयंती आणि स्मृतिदिनाचा समावेश करावा. संत गाडगेबाबांच्या तैलचित्रांचा समावेश शासकीय कार्यलयामध्ये असावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
४या आंदोलनात विदर्भ कार्याध्यक्ष अशोक लोणकर, जिल्हाध्यक्ष संजय भोंग, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष गणेश हिवरकर, जिल्हाध्यक्ष महिला गीता क्षीरसागर, गिरीष भोवरे, सेलू तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भिलकर, बाबाजी टेंभेकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष प्रवीण काटकर, गजानन मस्के, संजय भोवरे, रामेश्वर वाघमारे, अ‍ॅड. विठ्ठल लोणकर, गणपत मंगेकर, भैय्याजी वाघमारे, भाऊराव नाकाडे, भैय्याजी डोळसकर, रामेश्वर काळे, तुकारामजी वाघमारे, बबन सोनुलकर, मनोज दुरतकर, सुभाष काळे, नरेंद्र तुळसकर, गुणवंत भोवरे, राजेंद्र लोणकर, नरेंद्र वाघमारे, अमोल वाघमारे, आनंद देशकर, देवीदास क्षीरसागर, राहुल वाघमारे, पंकज लोणकर, दिलीप पाटील, सचिन लोणकर, गजानन गड्डमवार, दीपक लोणारे, सुधाकर नाकाडे, मधुकर वाघमारे, प्रा. सुभाष शेवाणे, जयप्रकाश सोनुलकर, गजानन मुंडोकार, वसंत बारस्कर, किशोर क्षीरसागर यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

फळ-भाजी विक्रेत्यांना हटवू नका
४मुख्य बाजारात फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फळविके्रत्यांना व किरकोळ भाजीपाला विके्रत्यांना इतरत्र न हटविता तेथेच कायम ठेवावे. हे विके्रते मागील ३०-३५ वर्षांपासून त्याच ठिकाणी व्यवसाय करून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहे. त्याऐवजी खरेदीकरिता येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी ठेवण्याकरिता जुन्या नगरपालिका इमारतीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना त्यांची भेट घेऊन केली. याप्रसंगी विक्रेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Sit down on the executive table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.