सितादहीपुर्वीच कापूस झाला मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:20 PM2017-10-20T23:20:01+5:302017-10-20T23:20:12+5:30
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात शेतकरी मुठभरतरी कापूस ठेवून पुजा करतो. तीच त्याची लक्ष्मी. मात्र यंदा दिवाळीपुर्वी सितादहीचा कापूस वेचणीपूर्वीच अवकाळी पावसाने झोडपून काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात शेतकरी मुठभरतरी कापूस ठेवून पुजा करतो. तीच त्याची लक्ष्मी. मात्र यंदा दिवाळीपुर्वी सितादहीचा कापूस वेचणीपूर्वीच अवकाळी पावसाने झोडपून काढले. कपासी जमिनीवर वाळली. सवंगलेले व सवंगणीला तयार असलेले सोयाबीन पावसात चिंबचिंब भिजल्या गेले. दिवाळीच्या सणापूर्वीच शेतकºयांचा शेतमाल मातीमोल झाला. कपाशीच्या फुटलेल्या बोंडाच्या सरकीला बोंडातूनच अंकूर फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
पावसामुळे सोयाबीन शेतात सडत आहे. धान्य मार्केटात ओले सोयाबीन घ्याययला व्यापारी तयार नाही. ओलाव्यामुळे तेही सडत आहे. पावसाचा दणका एवढा जबरदस्त की झाडावरच्या कापसाला अंकूर फुटले. सितादही पूर्वीच केविलवाणी अवस्था झाली आहे. शेतकºयांनी शेतीवर केलेला खर्च खाणी तोंडे यांचा ताळमेळ बसविण्याची कसरत सुरू असताना निसर्गही ऐनवेळेवर जखमेवर मिठच चोळते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
दिवाळीपूर्वी सितादहीचा कापूस घरी यायचा. यावर्षी तो शेतात ओला झाला. एवढेच काय माणूसभर उंची कपासीची झाडे पावसाचा जोर व वाºयाने जमिनीवर आडवी झाली. शेतकºयांनी ती झाडे मजूर लावून उभी करण्याचा प्रयत्न केला तर झाडांच्या फांद्या कटाकट तुटू लागल्या. डोळ्यातील असावे गिळत शेतकरी संकटांना तोंड तरी कसा देणार हाच प्रश्न शेतकरी विचारत आहे.