सेवाग्राम आश्रमात आजही जपल्या जातात गांधीजींच्या काळातील शिंदोळ्याच्या चटया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:09 PM2018-01-10T14:09:00+5:302018-01-10T14:10:14+5:30

सेवाग्राम आश्रमात राहताना म. गांधीजी ज्या चटया वापरत होते त्यांची देखभाल येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे या स्वत: जातीने करीत अशतात.

Sitting mats of Gandhi era are still safe in Sewagram ashram | सेवाग्राम आश्रमात आजही जपल्या जातात गांधीजींच्या काळातील शिंदोळ्याच्या चटया

सेवाग्राम आश्रमात आजही जपल्या जातात गांधीजींच्या काळातील शिंदोळ्याच्या चटया

Next
ठळक मुद्देज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे करतात निगुतीने देखभाल

लोकमत न्यूज नेटवर्क
दिलीप चव्हाण
वर्धा: सेवाग्राम आश्रमात राहताना म. गांधीजी ज्या चटया वापरत होते त्यांची देखभाल येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे या स्वत: जातीने करीत अशतात. वर्धा व सेवाग्रामसह विदर्भाच्या अनेक भागात आढळणाऱ्या शिंदोळ्याच्या झाडांच्या पानोळ्यापासून या चटया बनविल्या जात असत. आता ती झाडेही कुठे आढळत नाहीत. या पानोळ्यापासून चटया, आसनपट्ट्या व आसने बनविली जात. त्यावेळी शिंदोळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. अतिशय मजबूत व लवचिक अशा या पानोळ्याची बनविलेली ही आसने आजही येथे आपल्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देत आहेत.
त्यांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी कुसूमताई पांडे या स्वत: पार पाडतात. अलीकडेच त्यांनी या चटयांची दुरुस्तीही केली. सेवाग्राम येथील आक्षमात अशा अनेकविध वस्तू व बाबी साध्या राहणीचे व तत्कालीन संस्कृतीचे जतन करत आहेत.

Web Title: Sitting mats of Gandhi era are still safe in Sewagram ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.