परिस्थितीनेच बळ दिले
By admin | Published: May 28, 2015 01:35 AM2015-05-28T01:35:22+5:302015-05-28T01:35:22+5:30
घरची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही चांगले शिक्षण घेण्याकरिता घरच्यांनी तडजोड केली.
वर्धा : घरची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही चांगले शिक्षण घेण्याकरिता घरच्यांनी तडजोड केली. यातूनच जीवापाड मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली, असे मनोगत आहे, इयत्ता बारावीत ९३.६९ टक्के गुण घेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या पीयूष डुडरकर याचे!
पीयूषचे वडील टेलरिंगचे काम करतात. स्वत:च्या मालकीचे दुकान नसल्याने त्यांना दुकानातून आॅर्डरवर मिळेल त्या आधारे काम करावे लागते. शिवाय त्यांच्या मिळकतीतूनच घरखर्च चालतो. यात पीयूषला लहानपणापासून अभियंता होण्याची इच्छा असल्याने वडिलांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला. परिस्थतीची जाण ठेवत अभ्यासाचा ध्यास कधी सोडला नाही. त्यामुळे आज हे यश पदरी पडल्याच्या भावना पीयूषने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण खर्चिक असले तरी शिकवणी वर्गाचे शिक्षक व नातेवाईक पाठीशी असल्याचे, तो सांगतो. मेहनतीला चिकाटीची जोड दिल्यास प्रत्येक दिव्य पार करता येते, हे त्याने दाखवून दिले आहे.