भरउन्हात बसफेऱ्यांअभावी प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:36 PM2019-04-30T23:36:55+5:302019-04-30T23:37:19+5:30

जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेतल्याचे चित्र बसस्थानकावर पाहावयास मिळत आहे.

The situation of the passengers arriving due to absenteeism | भरउन्हात बसफेऱ्यांअभावी प्रवाशांचे हाल

भरउन्हात बसफेऱ्यांअभावी प्रवाशांचे हाल

Next
ठळक मुद्देपुलगाव आगाराचे नियोजन ढेपाळले : प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी

प्रभाकर शहाकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेतल्याचे चित्र बसस्थानकावर पाहावयास मिळत आहे.
एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास, सौजन्य सप्ताह, प्रवासी जोडो अभियान, हात दाखवा बस थांबवा, हे अभियान चालविणारे परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याची ऐसीतैशी करताना दिसत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. जवळपास सहा दशकांपेक्षाही अधिक काळापासून गाव खेड्यापासून तर शहराच्या रस्त्यावर परिवहन मंडळाची बस धावत आहे. रौप्य महोत्सवी वर्षात परिवहन महामंडळाने प्रवाशांचा मनोरंजनात्मक प्रवास व्हावा म्हणून बसगाड्यांमध्ये साऊंड सिस्टीम सुरू केली होती. ती बंद करून बसगाड्यांमध्ये टी.व्ही. बसविण्यात आले. साहजिकच प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी परिवहन मंडळाची बस आपलीशी वाटू लागली. मध्यंतरी अनेक मार्गावर खासगी वातानुकूलित बससेवा सुरू झाली. आरामदायी व जलद सेवेमुळे प्रवासी या सेवेकडे आकर्षित होऊ लागले. मात्र, काही काळातच याही खासगी सेवेत तुघलकी कारभार सुरू झाला.
याचाच लाभ घेत परिहवन मंडळाने प्रवाशी जोडो अभियान, हात दाखवा बस थांबवा, सौजन्य सप्ताह आदी अभियान राबवित प्रवाशांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. याचा अल्पावधीतच बोजवारा उडाला. दिवाळीत प्रवाशांची गर्दी पाहता मंडळाकडून होणारी भाडवाढ, सुट्या पैशासाठी वाहकाशी होणारा वाद, मार्गात प्रवासी बसेसची प्रतीक्षा करीत राहतो. हात दाखवितो मात्र, त्याचा हात तसाच राहतो. चालक बस थांबवत नाही. भंगार बसगाड्या, फाटलेले आसन, काच नसणाºया खिडक्या, धक्कामार बस आदी सर्व बाबी प्रवाशांकरिता त्रासदायक ठरत आहेत. याची कैफियत मांडायची तर कुणाकडे? असा प्रश्न सतत प्रवाशांतून केला जात आहे.
इतकेच नव्हे, तर बसस्थानकावरील पंखे भर उन्हाळ्यातही बंद राहणे, रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य, पाण्याचा अभाव या सर्व गोष्टी परिवहन मंडळाच्या पथ्यावर पडून खासगी प्रवासी वाहतूक फोफावत आहे. उन्हाळ्यात लग्न सराईच्या हंगामात परिवहन महामडळाने अतिरिक्त फेºया सुरू करणे किंवा अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे गरजेचे असते. परंतु, नेमके याच काळात प्रासंगिक करारासाठी बसेस दिल्या जातात. परिणामी, स्थानकात वेळापत्रक प्रभावित होते. अनेक बसच्या फेºया रद्द केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी होते.
एखादी बस आली की खांद्यावर मुले घेऊन प्रवासी मंडळी, जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेते. बसमध्ये चढण्याच्या घाईत प्रवाशांचे खिसे, महिलांच्या पर्स, महिलांना धक्काबुक्की हे सर्व प्रकार होऊनही बस भरून जाते. त्यातही वाहक मात्र सुटे पैसे न देताच आपले भले करून घेतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पहिवहन मंडळाने लग्नसराईत अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे, वेळापत्रकानुसार फेºया, चालक वाहकांची प्रवाशांची सौजन्यपूर्ण वागणूक आदी बाबींकडे लक्ष घेऊन आपली सेवा ही प्रवाशांच्या सेवेसाठीच ठेवावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

Web Title: The situation of the passengers arriving due to absenteeism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.