विदर्भातील सहा जिल्हे डिझेलमुक्त करणार- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 18:04 IST2019-10-12T18:03:27+5:302019-10-12T18:04:33+5:30
सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही.

विदर्भातील सहा जिल्हे डिझेलमुक्त करणार- नितीन गडकरी
वर्धा : सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही. ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला फायदा व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करून इथेनॉलवर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते वर्धा येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर खा. रामदास तडस, खा. विकास महात्मे, वर्धेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे, आ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रविकांत बालपांडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, समीर देशमुख, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. गडकरी पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्येला दोन महत्वाची कारणे असून त्यात महत्वाचा म्हणजे सिंचनाचा अभाव हा आहे. कमीत कमी ५० टक्केच्यावर सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. मेट्रो ट्रेनचे डबे तयार करण्यासाठीचा नवा कारखाना सिंदी रेल्वे येथे होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.